एकमेकांचे कपडे फाडून लाथा, बुक्क्यांनी मारहाण...; मुंबई एअरपोर्टवर घडला भयानक प्रकार

मुंबई तक

04 Jun 2025 (अपडेटेड: 04 Jun 2025, 04:31 PM)

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कॅब ड्रायव्हर आणि क्रिस्टल सुरक्षा कर्मचाऱ्यांमधील वादामुळे मारहाणीचं प्रकरण समोर आलं आहे.

मुंबई एअरपोर्टवर कॅब चालक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी एकमेकांची मारहाण...

मुंबई एअरपोर्टवर कॅब चालक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी एकमेकांची मारहाण...

Google CTA

बातम्या हायलाइट

point

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मारहाणीचं प्रकरण

point

कॅब ड्रायव्हर आणि क्रिस्टल सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये झाला वाद

point

लाथा, बुक्क्यांनी केली मारहाण

Mumbai news: मुंबई विमानतळावर बरेच भयानक प्रकार घडत असल्याचं पाहायला मिळतं. अशातच आता मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मारहाणीचं प्रकरण समोर आलं आहे. यावेळी क्रिस्टल सुरक्षा कर्मचारी आणि कॅब ड्रायव्हर यांच्यातील भांडणाचा व्हिडीओ समोर आला आहे. यावेळी क्रिस्टल सुरक्षा कर्मचारी आणि कॅब चालकांमध्ये पार्किंगवरून वाद झाल्याचं सांगितलं जात आहे. वाद नंतर इतका वाढत गेला की त्याचं रुपांतर मारहाणीत झालं. यानंतर त्यावेळी ड्युटीवर असलेल्या जवानांनी यामध्ये लक्ष घालून हा वाद मिटवला. आता पोलीस या प्रकरणातील व्हायरल व्हिडीओच्या आधारे तपास करत आहेत. 

हे वाचलं का?

मारहाणीत कपडे फाटले

व्हिडीओ मध्ये विमानतळावर अनेक टॅक्सी पाहायला मिळत आहेत. यादरम्यान, क्रिस्टल सुरक्षा कर्मचारी आणि तिथल्या ड्रायव्हरमध्ये वाद झाला. त्यावेळी ड्रायव्हर आणि कर्मचाऱ्यांनी एकमेकांना मारण्यास सुरुवात केली. इतकेच नव्हे तर या मारहाणीत एका ड्रायव्हरचे कपडे देखील फाटले. 

हे ही वाचा: 15 तोळे सोनं, स्कोडा आणि चांदीची भांडी आणि वैष्णवीसारखाच छळ... पुण्यात पुन्हा तोच प्रकार

CISF जवानाने मिटवलं प्रकरण

या घटनेमुळे पार्किंग परिसरात मोठा गोंधळ उडाला. त्यावेळी घटस्थळी उपस्थित असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) जवानाने प्रकरणात लक्ष घालून वाद मिटवण्याचा प्रयत्न करत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. सध्या, स्थानिक पोलीस या वादामागचं कारण जाणून घेण्यासाठी आणि या प्रकरणात समाविष्ट असलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 

हे ही वाचा: निराधार योजनेसाठी पत्नीने मृत दाखवलं, तो पती थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात...जालन्याचं प्रकरण काय?

पोलिसांचा तपास

पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर क्रिस्टल सुरक्षा कर्मचारी आणि बऱ्याच कॅब चालकांमध्ये मारहाणीचं प्रकरण समोर आलं आहे. आता या घटनेचा तपास सुरू आहे आणि तपास झाल्यानंतर पुढची कारवाई करण्यात येईल.