मुंबईतील सांताक्रूझमध्ये सिलिंडरचा मोठा स्फोट, भीषण आग लागून चाळ हादरली, गॅस मेकॅनिकसह इतर जखमी

मुंबई तक

20 Feb 2026 (अपडेटेड: 20 Feb 2026, 01:25 PM)

Mumbai Sylinder Blast : मुंबईतील सांताक्रूझ पूर्वेकडे वाकोला येथील दिघे चाळीत गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तीन सदस्यांसह चार जण गंभीरपणे जखमी झाले आहेत. हा स्फोट इतका भीषण होता की घराबाहेर बसलेला एक वृद्ध व्यक्ती हवेच्या दाबाने खाली फेकला गेला, ही संपूर्ण घटना जवळच्या सीसीटीव्ही कॅमऱ्यात कैद झाल्याचे वृत्त आहे.  

Mumbai Sylinder Blast

Mumbai Sylinder Blast

Google CTA

बातम्या हायलाइट

point

सांताक्रूझ पूर्वेकडे दिघे चाळीत गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट

point

स्फोटातील जखमींची नावे समोर 

point

एका चुकीमुळे मोठा स्फोट

Mumbai Sylinder Blast : मुंबईतील सांताक्रूझ पूर्वेकडे वाकोला येथील दिघे चाळीत गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तीन सदस्यांसह चार जण गंभीरपणे जखमी झाले आहेत. हा स्फोट इतका भीषण होता की घराबाहेर बसलेला एक वृद्ध व्यक्ती हवेच्या दाबाने खाली फेकला गेला, ही संपूर्ण घटना जवळच्या सीसीटीव्ही कॅमऱ्यात कैद झाल्याचे वृत्त आहे.  

हे वाचलं का?

हे ही वाचा : '..यासाठी मी त्यांना परत भेटीन' एकनाथ शिंदेंच्या भेटीबद्दल काय म्हणाले राज ठाकरे?

सांताक्रूझ पूर्वेकडे दिघे चाळीत गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट

वृत्तानुसार ही घटना गुरुवारी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास गावडे कुटुंबाच्या दिघे चाळ येथील घरात गॅस स्टोव्हची दुरुस्ती सुरु असताना अचानकपणे सिलिंडरचा मोठा स्फोट झाला आणि मोठी आग लागली. स्फोटाचा आवाज इतका भयंकर होता की जवळच्या घरांमध्ये कंपने निर्माण झाली. दरम्यान या दुर्घटनेत जखमींची नावे समोर आली आहेत.

स्फोटातील जखमींची नावे समोर 

सुमती रामेश गावडे (वय 65), अवंतिका अजय गावडे (वय 45), यश गावडे (वय 10) आणि गॅस मेकॅनिक जावेद अब्दुल शेख (वय 30) यांना दुखापत झाली. या घटनेच्या सीसीटीव्हीमध्ये स्फोटाची भीषणता दिसून येते. घराबाहेरील व्हरांड्यावर बसलेला एक वृद्ध स्फोटाच्या आवाजाने जमिनीवर कोसळला. 

हे ही वाचा : पुणे हादरलं! आईच्या मित्राचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; शाळेत सोडतो सांगून असं कारमध्ये बसवलं अन्...

एका चुकीमुळे मोठा स्फोट

या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी वाकोला पोलीस आणि अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. दुरुस्तीदरम्यान झालेल्या एका चुकीमुळे मोठा स्फोट झाला याचा तपास पोलीस करत आहेत.