मुंबई लोकलमध्ये बुरखा परिधान केलेला पुरुष महिलांच्या डब्यात, व्हिडिओ आला समोर

Mumbai Crime : मुंबई लोकल ट्रेनमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एक बुरखा परिधान केलेला पुरुष महिलांच्या डब्यात घुसला, ज्यामुळे महिला प्रवाशांमध्ये घबराट पसरली. महिलांनी धाडस दाखवले आणि त्याला पकडण्याच्या प्रयत्न केला.

mumbai crime

mumbai crime

मुंबई तक

• 04:20 PM • 08 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई लोकल ट्रेनमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस

point

बुरखा परिधान केलेला पुरुष महिलांच्या डब्यात

Mumbai Crime : मुंबई लोकल ट्रेनमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका बुरखा परिधान केलेला पुरुष महिलांच्या डब्यात घुसला, ज्यामुळे महिला प्रवाशांमध्ये घबराट पसरली. महिलांनी धाडस दाखवले आणि त्याला पकडण्याच्या प्रयत्न केला, परंतु घोटकोपर स्थानकावर ट्रेनचा वेग कमी झाल्यानंतर त्याने ट्रेनमधून उडी मारली आणि तो पळून गेला. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : गर्लफ्रेंडचा दुसऱ्याच तरुणाशी ठरला विवाह, बॉडीबिल्डर बॉयफ्रेंडला समजताच बंद खोलीतच... हादरवून टाकणारं प्रेम

सीएसएमटी लोकल ट्रेनमध्ये बुरखा परिधान केलेला पुरुष

सीएमसएमटीकडे जाणारी लोकल ट्रेन घाटकोपरमध्ये येताना ही घटना घडली. महिलांनी संबंधित बुरखा परिधान केलेली व्यक्ती ही पुरुष असल्याचा संशय आला. महिलांनी त्याची चौकशी केली असता, तो घाबरून झाला. काही महिलांनी त्याचे मोबाईल फोनवर चित्रीकरण केले.  

महिलांनी व्हिडिओ रेकॉर्ड केला

घाटकोपर स्थानकाच्या फ्लॅटफॉर्मवर, अटकेच्या भीतीने संशयिताने चालत्या ट्रेनमधून उडी मारून आपला जीव धोक्यात घातला. नंतर तो प्लॅटफॉर्मच्या दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या बुरखा परिधान केलेल्या पुरुषावर सहप्रवाशांना संशय आला. महिलांना त्याची चौकशी सुरु केली तेव्हा तो घाबरून गेला. काही महिलांनी त्याचे मोबाईल फोनवरून चित्रीकरण केले.  

हे ही वाचा : 63 वर्षीय शिकवणी मास्तरांकडून 13 वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार, पीडित मुलगी राहिली गर्भवती

या घटनेची माहिती मिळताच, रेल्वे सुरक्षा सुरक्षा दल आणि सरकारी रेल्वे पोलीस यांनी कारवाई केली. पोलिसांनी तात्काळपणे  मुलुंड आणि ठाणे स्थानकावरनाकाबंदी केली, पण आरोपीला पकडता आलं नाही. या प्रकरणी आरोपीवर घाटकोपर येथील आरपीएफने गुन्हा दाखल केला आहे. 

    follow whatsapp