मुंबई हादरली! नवऱ्याला बायकोसोबत एकांत मिळेना, मुलगी यायची सतत नात्याच्याआड, नंतर गळा दाबून मृतदेह फेकला समुद्रात

Mumbai Crime : मुंबईतील अँटॉप हिलमध्ये धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. बापानेच आपल्या लेकीचा खून केला आहे. याचं कारण ऐकून तुमच्याही तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही.

Mumbai Crime

Mumbai Crime

मुंबई तक

• 09:20 AM • 21 Aug 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईत मन हेलावून टाकणारा धक्कादायक प्रकार

point

बापानेच मुलीला संपवलं

point

धक्कादायक कारण आलं समोर

point

नेमकं काय घडलं?

Mumbai Crime : मुंबईत मन हेलावून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आलं आहे. अँटॉप हिल येथील परिसरात बापानेच आपल्या मुलीची हत्या केली आहे.वडिलांनी मुलीला संपवण्याचं धक्कादायक कारण आता समोर आलं आहे. मुलीमुळे आपल्या पत्नीला वेळ देता येत नसल्याने बापानेच आपल्या पोटच्या लेकीची हत्या केली आहे. संबंधित प्रकरणात आरोपी वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटकही करण्यात आली आहे. या घटनेनं अँटॉप हिलमध्ये हळहळ व्यक्त केली जाते.

हे वाचलं का?

हे ही वाचा : आज 21 ऑगस्ट लक्ष्मी नारायण योग झाला तयार, 'या' राशीतील लोकांचं भाग्य चमकणार, काय सांगतं राशीभविष्य

नेमकं काय घडलं? 

घडलेल्या घटनेनुसार, पत्नीसोबत एकांत मिळत नसल्याच्या रागातून बापाने आपल्या मुलीला संपवलं. मुलगी सारखीच दोघांच्या नात्यांत येत असल्याने बापाने असं टोकाचं पाऊल उचललं आहे. मुबईतील कुलाबा परिसरात त्याने आपल्या लेकीचा गळा दाबत तिची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह हा समुद्रात फेकून दिल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या मृत मुलीच्या कुटुंबीयांचा शोध घेत मृतदेह हा शवविच्छेदनासाठी रुग्णालायत पाठवला होता. 

मुलगी आणि वडील एकाच वेळी गायब

मुलीच्या वडिलांविषयी पोलिसांना माहिती मिळाली की, मुलगी बेपत्ता असल्याची आईनं तक्रार दाखल केली होती. मुलीसह तिचे वडिलही बेपत्ता असल्याचं तिच्या आईचं म्हणणं आहे. हीच माहिती पोलिसांना मिळाली असता, पोलिसांचा मुलीच्या वडिलांवर अधिक संशय बळावला गेला. मुलीच्या शवविच्छेदनाच्या रिपोर्टमध्ये मुलीची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. संबंधित प्रकरणात पोलिसांनी आपले पथक शोध मोहिमेसाठी पाठवले आणि शोध सुरु ठेवला. अंतिमक्षणी वरळी भागातून पोलिसांनी मुलीच्या बापाला अटक केली. आरोपी हा मुलीचा सावत्र बाप असल्याची माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा : कल्याण-डोंबिवलीची कहाणी: शिंदे-चव्हाण पुढारी असलेल्या KDMC ची एवढी दैना झाली तरी कशी?

अखेर गुन्ह्याचा कबुलीनामा

आरोपीने चौकशीदरम्यान, आपल्या गुन्ह्याचा कबुलीनामा दिला. त्याने सांगितलं की, त्या 4 वर्षांच्या मुलीमुळे तो बायकोसोबत एकांतात राहू शकत नव्हता. ती मुलगी रात्रीपर्यंत मोबाईलवर गेम खेळायची. त्यामुळे आरोपी बापाची सतत चिडचिड व्हायची. याच सर्व रागातून त्याने आपल्या मुलीचा गळा दाबून हत्या केली. 

  

    follow whatsapp