मुंबई: रिटायर्ड एअरलाइन कर्मचाऱ्याने पत्नीची केली निर्घृण हत्या! अधिक काळापासून वेगळे... नेमकं प्रकरण काय?

पवई परिसरात राहणाऱ्या एका 60 वर्षीय रिटायर्ड एअरलाइन कर्मचाऱ्याने आपल्या पत्नीची निर्घृणपणे हत्या केल्याचं सांगितलं जात आहे. नेमकं काय घडलं? सविस्तर जाणून घ्या.

रिटायर्ड एअरलाइन कर्मचाऱ्याने पत्नीची केली निर्घृण हत्या

रिटायर्ड एअरलाइन कर्मचाऱ्याने पत्नीची केली निर्घृण हत्या

मुंबई तक

• 04:54 PM • 30 Sep 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

रिटायर्ड एअरलाइन कर्मचाऱ्याने पत्नीची केली निर्घृण हत्या

point

मुंबईतील महिलेसोबत नेमकं काय घडलं?

Mumbai Crime: पती आणि पत्नीच्या वादातून बऱ्याच धक्कादायक घटना घडत असल्याचं समोर येतं. किरकोळ कारणामुळे झालेला वाद टोकाला पोहचत असल्याचं पाहायला मिळतं. मुंबईमध्ये अशीच एक घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. येथील पवई परिसरात राहणाऱ्या एका 60 वर्षीय रिटायर्ड एअरलाइन कर्मचाऱ्याने आपल्या पत्नीची निर्घृणपणे हत्या केल्याचं सांगितलं जात आहे. नेमकं काय घडलं? सविस्तर जाणून घ्या.

हे वाचलं का?

नेमकी घटना काय?  

मुंबईतील पवई परिसरात राहणाऱ्या एका 60 वर्षीय रिटायर्ड एअरलाइन कर्मचाऱ्याने आपल्या पत्नीची निर्घृणपणे हत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. पीडित पत्नी ही आपल्या नवऱ्यापासून वेगळी राहत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकरणातील आरोपी तरुणाचं नाव राजीव चंद्रकांत लाला असून मृत महिलेचं नाव शालिनी देवी असल्याची माहिती समोर आली आहे. पीडित महिला ही 54 वर्षांची असल्याचं सांगण्यात येत आहे. 1993 मध्ये दोघांचं एकमेकांसोबत लग्न झालं, लग्नाच्या काही काळानंतर दोघांमध्ये मतभेद आणि वाद होऊ लागले. सततच्या भांडणामुळे दोघेही लग्नाच्या दोन वर्षांनंतरच म्हणजेच 1995 पासून त्यांनी एकमेकांपासून वेगळं राहण्यास सुरूवात केली.

हे ही वाचा: ऑनलाइन गेमिंगचा नाद लय बेकार! पाच लाख रुपये गमावून बसला, नंतर कर्ज फेडण्यासाठी रचला ‘तो’ खोटा बनाव...

उशीने तोंड दाबून पत्नीची हत्या  

पोलिसांच्या माहितीनुसार, शनिवारी रात्री आरोपी राजीव त्याची काही कागदपत्रे घेण्यासाठी पवई येथील त्याच्या पत्नीच्या घरी गेला होता. त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला आणि हा वाद टोकाला पोहोचला. याच कारणावरून, रागाच्या भरात राजीवने उशीने शालिनीचं तोंड दाबून तिची हत्या केल्याची माहिती आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर, आरोपी पती घटनास्थळावरून पळून गेला परंतु त्यावेळी त्याने त्याचा मोबाईल फोन आणि गाडीच्या चाव्या घटनास्थळीच म्हणजेच मृत महिलेच्या घरीच सोडल्या. या पुराव्यामुळे पोलिसांना आरोपीचा शोध घेण्यास मदत झाली.

हे ही वाचा: दुबईहून पती घरी परतला, पत्नीसोबत खोलीचा आतला दरवाजा बंद केला अन्... सकाळी वडील घरी आले अन् ‘त्या’ अवस्थेत...

पोलीस अधिकाऱ्यांनी दिली माहिती  

डीसीपी दत्ता किशन नलावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हत्येमागील नेमकं कारण आणि घटनेला कारणीभूत असलेल्या घटना जाणून घेण्यासाठी पोलिस सध्या आरोपीची चौकशी करत असल्याची माहिती समोर आली आहे.

    follow whatsapp