कोल्हापुरातील नामांकित इंजिनीअरिंग कॉलेजच्या विभागप्रमुखाला अटक, 20 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा आरोप

Kolhapur Crime News : कोल्हापूरच्या केआयटी (KIT) कॉलेजमधील पर्यावरण विभागाचे प्रमुख प्रा. सौरभ जोशी यांनी एका विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार आज उघडकीस आला. याप्रकरणी शेजारील जिल्ह्यातील एका 20 वर्षीय विद्यार्थिनीने शुक्रवारी रात्री गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी संशयित सौरभ संजय जोशी याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

Kolhapur Crime News

Kolhapur Crime News

मुंबई तक

• 08:32 AM • 08 Mar 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

कोल्हापुरातील प्रसिद्ध इंजिनीअरिंग कॉलेजच्या विभागप्रमुखाला अटक

point

20 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा आरोप

Kolhapur Crime News, दीपक सूर्यवंशी : कोल्हापूरच्या केआयटी (KIT) कॉलेजमधील पर्यावरण विभागाचे प्रमुख प्रा. सौरभ जोशी यांनी एका विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार आज उघडकीस आला. याप्रकरणी शेजारील जिल्ह्यातील एका 20 वर्षीय विद्यार्थिनीने शुक्रवारी रात्री गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी संशयित सौरभ संजय जोशी याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. आज न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, केआयटी कॉलेज व्यवस्थापनाने प्रा. सौरभ जोशी यांना निलंबित केले असून, त्यांच्यावरील तक्रारींची चौकशी करण्यासाठी एक समितीही स्थापन केली आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : Maharashtra Weather : मार्च महिन्यात उष्णतेची लाट, 3 जिल्ह्यांना तापमानाचा यलो अलर्ट

केबिनमध्ये बोलवून अश्लील चाळे

सौरभ संजय जोशी (वय 38, रा. स्मृती अपार्टमेंट, बाबूजमाल दर्ग्याजवळ, कोल्हापूर शहर) हे केआयटी कॉलेजमध्ये पर्यावरण विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका 20 वर्षीय विद्यार्थिनीला वारंवार आपल्या केबिनमध्ये भेटायला बोलावले. तसेच तिला स्वतःच्या मोबाईलवर मेसेज करण्यास आणि कॉल करण्यास सांगून ते सतत तिच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत होते. हा प्रकार गेल्या चार-पाच महिन्यांपासून सुरू होता. यादरम्यान, जोशी यांनी विद्यार्थिनीला केबिनमध्ये बोलावून तिच्याशी अश्लील चाळे केले.

सौरभ जोशीला अटक

या प्रकारामुळे संतापलेल्या पीडितेने शुक्रवारी रात्री गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत सौरभ जोशीला अटक केली. कोल्हापुरातील नामांकित समजल्या जाणाऱ्या केआयटी कॉलेजमध्ये घडलेल्या या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

हे ही वाचा : रेकॉर्डिंग डिलिट केल्याने मुलगा बनला हैवान, आईच्या तोंडात बनियनचा बोळा करुन कोंबला अन्...बदलापूरात धक्कादायक घटना

निलंबन आणि समितीची नेमणूक

या गैरवर्तणुकीबद्दल कॉलेज व्यवस्थापनाने जोशी यांना निलंबित केले असून, या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी अंतर्गत समिती नेमण्यात आली असल्याची माहिती केआयटीचे डॉ. मोहन वनरोट्टी यांनी दिली.

    follow whatsapp