Mumbai Crime: मुंबईत गुन्हेगारीच्या वाढत्या प्रमाणामुळे शहरातील पोलीस आणि यंत्रणेच्या कामावर प्रश्न उपस्थित होत आहेत. मुंबईतील मोठ्या शहरातून अशीच धक्कादायक बातमी समोर आली आहे. सोमवारी (24 नोव्हेंबर) दुपारच्या सुमारास डोंबिवली शहरातील पलावा उड्डाणपुलाच्या खाली सूटकेसमध्ये सडलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळला. तो मृतदेह एका महिलेचा असल्याचं स्पष्ट झालं.
ADVERTISEMENT
सूटकेसमध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह
डोंबिवलीच्या पलावा फ्लायओव्हरच्या खाली दुपारी जवळपास 1.45 वाजताच्या सुमारास देसाई खाडीजवळील एका निर्जनस्थळी सूटकेसमध्ये एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला. मृत महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, महिलेच्या मृत्यूमागचं नेमकं कारण हे पोस्टमॉर्टम रिपोर्ट्सवरूनच स्पष्ट होईल.
हे ही वाचा: शाळेत गेलेल्या अल्पवयीन मुलीचं अपहरण करून सामूहिक बलात्कार! कुटुंबीय म्हणाले की...
पोलिसांचा संशय
वरिष्ठ पोलीस अधिकारी राजेश ठाकूर यांनी या प्रकरणाबाबत माहिती दिली. संबंधित महिलेचं वय जवळपास 25 ते 30 असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. सडलेल्या अवस्थेत पोलिसांनी मृतदेह आढळल्याने तीन दिवसांपूर्वी महिलेची हत्या करण्यात आली असावी, अशी पोलिसांना शंका आहे.
हे ही वाचा: ऑफिसमध्येच जडलं प्रेम, नंतर शारीरिक संबंध! पण 'त्या' भितीमुळे नोकरी सोडून तरुणाने गाठली मुंबई अन्...
हत्येपूर्वी बेदम मारहाण...
या घटनेच्या तपासादरम्यान, महिलेला हत्येपूर्वी बेदम मारहाण केली असल्याचे काही पुरावे सापडले आहेत. हत्येनंतर, पीडितेचा मृतदेह बॅगेत भरून ती बॅग पुलाजवळील नाल्यात फेकून दिल्याचं सांगितलं जात आहे. आरोपीने हत्येनंतर, पुरावे मिटवण्यासाठी अशा पद्धतीने मृतदेह खाडीत फेकून दिला होता. दरम्यान, प्रकरणाची माहिती मिळताच ऐरोली पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांच्या पथकाने अज्ञात आरोपीविरुद्ध हत्या आणि पुरावे मिटवण्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. तसेच, मृत महिलेची ओळख पटवण्यासाठी बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पोलिसांचा तपास सुरू आहे.
ADVERTISEMENT











