ऑफिसमध्येच जडलं प्रेम, नंतर शारीरिक संबंध! पण 'त्या' भितीमुळे नोकरी सोडून तरुणाने गाठली मुंबई अन्...

मुंबई तक

पीडितेने आपल्या ऑफिसमधील सहकाऱ्यावर लग्नाचं आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे गंभीर आरोप केले आहेत.

ADVERTISEMENT

त्या' भितीमुळे तरुणाने गाठली मुंबई अन्...
त्या' भितीमुळे तरुणाने गाठली मुंबई अन्...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ऑफिसमध्येच जडलं प्रेम, नंतर शारीरिक संबंध!

point

'त्या' भितीमुळे नोकरी सोडून तरुणाने गाठली मुंबई अन्...

point

नेमकं प्रकरण काय?

Crime News: एका महिलेने तिच्या ऑफिसमधील सहकाऱ्यावर गंभीर आरोप केल्याचं सांगितलं जात आहे. कोलकाता येथे राहणाऱ्या पीडितेने आपल्या सहकाऱ्यावर लग्नाचं आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे गंभीर आरोप केले आहेत. पीडिता आणि आरोपी एकाच ऑफिसमध्ये काम करत असून त्या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. दरम्यान, दोघांमधील जवळीक वाढत गेली आणि तरुणाने लग्नाचं आमिष दाखवून महिलेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. 

पीडितेचा प्रियकरावर लग्नासाठी दबाव 

पीडितेने आरोप करत सांगितलं की, जेव्हा तिने त्याच्यावर लग्नासाठी दबाव आणला तेव्हा आरोपी तिच्यापासून दूर राहू लागला. त्यानंतर, तो हळूहळू बोलणं कमी केलं आणि तिला भेटणं सुद्धा टाळत गेला. याच कारणामुळे पीडित महिलेला तिच्या प्रियकरावर संशय आला आणि तो लग्नापासून पळ काढत असल्याचं तिला वाटलं. 

नोकरी सोडून मुंबई गाठली अन्...

पोलिसांच्या तपासादरम्यान, आरोपी तरुणाने अचानक कोलकाता येथील नोकरी सोडून मुंबईमध्ये जाऊन नवीन जॉब जॉइन केल्याचं समोर आलं. त्याने त्याचा मोबाईल नंबरसुद्धा बदलला होता, यामुळे त्याची प्रेयसी त्याच्याशी संपर्क साधू शकत नव्हती. पोलिसांच्या मते, आरोपी परदेशात पळून जाण्याच्या तयारीत होता आणि यासाठी व्हिसा मिळवण्याची प्रक्रिया सुद्धा झाली होती. 

हे ही वाचा: "सिगारेट ओढण्यासाठी लायटर दे..." नकार दिल्यास तरुणाची निर्घृण हत्या! नागपुरातील धक्कादायक घटना

पोलिसांनी घेतलं आरोपीला ताब्यात 

पीडितेचा आरोपीशी संपर्क न झाल्याने तिने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी आरोपीचा तपास सुरू केला आणि त्याच्या सोशल मीडिया प्रोफाइल्स शोधून काढल्या. त्यानंतर, पोलिसांनी एका बनावट आयडीच्या माध्यमातून तरुणाशी बोलणं सुरू केलं. त्यावेळी, आरोपीच्या बोलण्यातून पोलिसांना त्याचं लोकेशन आणि मुंबईतील नोकरी करत असलेल्या कंपनीची माहिती मिळाली. 

हे वाचलं का?

    follow whatsapp