शाळेत गेलेल्या अल्पवयीन मुलीचं अपहरण करून सामूहिक बलात्कार! कुटुंबीय म्हणाले की...
एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अल्पवयीन मुलीचं अपहरण करून सामूहिक बलात्कार!
कुटुंबियांनी आरोपीविरुद्ध दाखल केली तक्रार
Crime News: ओडिशाच्या खोरधा जिल्ह्यातून एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, कुटुंबियांनी पीडिता बेपत्ता असल्याची तक्रार केली असता ही घटना उघडकीस आली. या धक्कदायक घटनेने स्थानिकांमध्ये एकच खळबळ उडाली असून प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती आहे.
मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार
19 नोव्हेंबर रोजी अल्पवयीन पीडितेच्या आई-वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. तक्रारदार म्हणाले की, त्यांची मुलगी काल शाळेत गेली होती मात्र त्यानंतर ती घरी परतलीच नाही. रात्रभर कुटुंबियांनी तिचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला पण, मुलीबद्दल काहीच माहिती मिळाली नाही.
पीडितेवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप
काही दिवसांनंतर, पीडितेची आई पुन्हा पोलिसात तक्रार करण्यासाठी गेली असता धक्कादायक बाब समोर आली. दुसऱ्यांदा तक्रार करताना मुलीची आई म्हणाली की, "माझ्या मुलीवर तिच्या एका मित्राने त्याच्या साथीदारांसोबत मिळून बलात्कार केला." पोलिसांच्या माहितीनुसार, महिलेच्या या आरोपामुळे पोलिसांना सुद्धा धक्का बसला बसून आरोपीचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
हे ही वाचा: ऑफिसमध्येच जडलं प्रेम, नंतर शारीरिक संबंध! पण 'त्या' भितीमुळे नोकरी सोडून तरुणाने गाठली मुंबई अन्...
'पीटीआय'च्या वृत्तानुसार, पीडित मुलीवर सध्या भुवनेश्वरच्या कॅपिटल रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. याआधी तिला 20 नोव्हेंबर रोजी खोरधा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, पीडितेची प्रकृती बिघडल्यानंतर तिला भुवनेश्वर येथील रुग्णालयात रेफर करण्यात आलं.










