"नोकरी गेली, आधार नाही, समाजाची भीती...", महिलेला उच्च न्यायालयाने दिली गर्भपात करण्याची परवानगी

महिलेनं कोर्टाला सांगितलं की, माझ्या गर्भावस्थेबद्दल माझ्या पालकांना काहीही माहिती नाही. जर त्यांना याची माहिती मिळाली, तर ते मला स्वीकारणार नाहीत.

Mumbai Tak

विद्या

25 Jun 2025 (अपडेटेड: 25 Jun 2025, 09:40 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

गर्भनिरोधाचे पर्याय वापरले, पण चुकून गर्भवती

point

महिलेनं कोर्टाकडे मागितली होती गर्भपाताची परवानगी

point

निकालात कोर्टाने काय म्हटलं?

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने एका 31 वर्षीय महिलेला वैद्यकीय गर्भपात (MTP) करण्याची परवानगी दिली आहे. महिलेनं कोर्टाला सांगितलं की, तिने गर्भधारणा टाळण्यासाठी गर्भनिरोधक उपाय केले होते, पण ते अपयशी ठरले आणि ती गर्भवती झाली. तसंच ज्या व्यक्तीमुळे ती गर्भवती झाली, त्या व्यक्तिच्या आता संबंधात नाही. त्यामुळे तिला प्रचंड मानसिक तणाव सहन करावा लागतोय असं म्हणत महिलेने स्पष्ट केलं की, तिला हा गर्भ ठेवण्याची इच्छा नाही.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> पतीने शारीरिक संबंधासाठी पत्नीला थेट पाठवलं मित्राकडे, फक्त 'या' एका गोष्टासाठी...

महिलेनं कोर्टाला सांगितलं की, माझ्या गर्भावस्थेबद्दल माझ्या पालकांना काहीही माहिती नाही. जर त्यांना याची माहिती मिळाली, तर ते मला स्वीकारणार नाहीत. तसं झालं, तर मी पूर्णपणे एकटी पडेल आणि मला कुणाचाही आधार मिळणार नाही. मी नुकतीच नोकरी सोडली असून, सध्या मी नवीन नोकरी शोधण्याऐवजी मुंबई आणि पुण्यातील डॉक्टरांकडे गर्भपातासाठी भेटी देतेय असं महिलेनं सांगितलं. 

कोर्टाचा निर्णय काय? 

न्यायाधीशांनी महिलेशी संवाद साधून तिचा निर्णय पूर्ण विचाराने आणि स्वेच्छेने घेतला गेला असल्याचं मान्य केलं. कोर्टाने नमूद केलं की, ती अत्यंत तणावात आहे आणि तिला कोणाचाही आधार नाही. महिलेनं सांगितलं की, ज्या व्यक्तिमुळे मी गर्भवती राहिली, त्याने कोणतीही मदत केली नाही, तोच या परिस्थितीला कारणीभूत आहे.

ती व्यक्ति कोर्टात हजर, मदत करण्याचं दिलं आश्वासन 

हे ही वाचा >> तरुणाचा मोबाइल वाजला, मेसेज पाहिला अन् हादरून गेला; 'त्याने' पाठवले होणाऱ्या पत्नीचे 'ते' Video आणि...

कोर्टाच्या आदेशानुसार, महिलेसोबत संबंध ठेवणाऱ्या त्या जोडीदाराला कोर्टात बोलावण्यात आलं. त्याने कोर्टात येऊन महिलेला वैद्यकीय आणि कायदेशीर खर्चासाठी एक लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली. तसंच, ती इच्छित असल्यास तिला रुग्णालयात घेऊन जाण्याची आणि तिच्यासोबत राहण्याची तयारीही त्याने दाखवली.

दरम्यान, न्यायालयाने महिलेच्या परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून तिला गर्भपाताची परवानगी दिली. त्यामुळे तिला मानसिक आणि भावनिक आधार मिळण्याची आशा आहे.

    follow whatsapp