मुंबईत 12 वर्षीय मुलीने 2 वर्षाच्या मुलीला सहाव्या मजल्यावरून ढकललं, आरोपीच्या आईनं..

मुंबई तक

16 Oct 2026 (अपडेटेड: 16 Oct 2026, 02:41 PM)

Mumbai News : मुंबईच्या दिंडोशी परिसरात एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीने दुसऱ्या 2 वर्षाच्या चिमुरडीला सहाव्या मजल्यावरून खाली फेकून दिल्याची ही दुर्दैवी घटना समोर आली.

Mumbai News

Mumbai News

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

2 वर्षीय मुलीला 12 वर्षीय मुलीने सहाव्या मजल्यावरून ढकललं

point

12 वर्षीय मुलीच्या आईने सीसीटीव्ही फुटेज डिलीट करण्याचा रचला कट 

Mumbai News : मुंबईच्या दिंडोशी परिसरात एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीने दुसऱ्या 2 वर्षाच्या चिमुरडीला सहाव्या मजल्यावरून खाली फेकून दिल्याची ही दुर्दैवी घटना समोर आली. या घटनेनं परिसर पूरता हादरून गेला आहे. ही घटना मुंबईच्या गोरेगाव परिसरातील शिवशाही प्रकल्प इमारत नंबर 1 येथील सहाव्या मजल्यावरती घडली होती. या घटनेनं परिसर पूरता हादरून गेला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : Astrology : नवरात्रोत्सवाचा सहावा दिवस 'या' राशींवर देवीची कृपा

2 वर्षीय मुलीला 12 वर्षीय मुलीने सहाव्या मजल्यावरून ढकललं

नुकतेच काही दिवसांपूर्वी या इमारतीत एक कुटुंब राहण्यात आले होते. याच कुटुंबातील एका 2 वर्षीय लहान मुलीला सहाव्या मजल्यावरून ढकलण्यात आले होते. अशातच स्थानिक लोकांच्या माहितीनुसार, इमारत नंबर 1 च्या सहाव्या मजल्यावर अबीरा शाकिर शेख (वय 2) ही चिमुरडी राहत होती, तसेच तिथेच दुसरी 12 वर्षीय अल्पवयीन मुलगी राहत होती. त्याच मुलीने अबीरा शेखला ढकलून दिले. 

12 वर्षीय मुलीच्या आईने सीसीटीव्ही फुटेज डिलीट करण्याचा रचला कट 

हा मन सुन्न करून टाकणारा धक्कादायक प्रकार 14 ऑक्टोबर रोजी रात्री 10:30 वाजता घडल्याचे सांगितले जात आहे. 12 वर्षीय मुलीच्या आईने तात्काळ सोसायटीतील केबिनमध्ये जाऊन सोसायटीचे सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज डिलिट करून पुरावा मिटवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सायबर एक्सपर्टकडून फुटेज रिकव्हरी केल्याने या घटनेचा पर्दाफाश झाल्याची माहिती समोर आली. 

हे ही वाचा : Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात कुठे पाऊस, कुठे उकाडा? पाहा कसं आहे आजचं हवामान

मात्र, दिंडोशी पोलीस या प्रकरणाच्या प्रत्येक पैलूचा बारकाईने तपास करत आहेत. सध्या, 12 वर्षांची मुलगी आणि तिची आई पोलीस कोठडीत आहेत. या प्रकरणात लवकरच नवीन खुलासे समोर येतील.