Mumbai News: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मुंबई सेंट्रल आणि ग्रँट रोड दरम्यान एक नवा केबल-स्टेड बेलासिस ब्रिज लवकरच खुला होणार असल्याचं समोर आलं आहे. 'बीएमसी'कडून बेलासिस ब्रिजचं काम पूर्ण करण्यासाठी 31 डिसेंबर 2025 ही डेडलाइन निश्चित करण्यात आली आहे. पुढील काही दिवसांत हा पूल उद्घाटनासाठी तयार होणार असल्याची अपेक्षा आहे. नुकतीच, हा ब्रिज लवकरच खुला होणार असल्याची अपडेट समोर आली होती. आता, बीएमसीचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (योजना) अभिजित बांगर यांनी हा पूल या वर्षाच्या अखेरीस खुला होणार असल्याचे संकेत दिले आहेत. बेलासिस ब्रिजचे बारा गर्डर बसवण्यात आले असून हा पूल प्रवाशांसाठी खुला झाल्यानंतर दक्षिण मुंबईला मोठा दिलासा मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
जुना बेलासिस ब्रिज हा पूर्वी एक प्रमुख रेल्वे ओव्हरब्रिज (ROB) म्हणून काम करत होता. पण, 2018 मध्ये झालेल्या ऑडिटनंतर हा ब्रिज कमकुवत असल्याचं आढळून आलं. यानंतर, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) वाढत्या वाहतुकीच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी जुना पूल पाडून त्या जागी नवीन पूल बांधण्याचा निर्णय घेतला. या ब्रिजच्या बांधकामासाठी 110 कोटी एकूण खर्च असल्याची माहिती आहे. यापैकी 70 कोटी बीएमसीने दिले असून रेल्वे विभाग ४० कोटी रुपये देणार असल्याचं सांगितलं जात आहे.
हे ही वाचा: Govt Job: RBI मध्ये 'या' पदांवर मिळवा नोकरी... काय आहे पात्रता? जाणून घ्या, अर्जाची शेवटची तारीख
मुंबईकरांसाठी चांगली बातमी...
नवा बेलासिस पूल 380 मी. लांब असून यामध्ये सहा वाहने मार्ग असतील, ज्यामुळे मागील तीन-लेन पुलाची क्षमता दुप्पट होईल. केबल-स्टेड स्ट्रक्चर आणि स्टील कन्स्ट्रक्शनने बांधलेल्या या पुलाचा पाया काँक्रीट असेल आणि रेल्वे रुळांपेक्षा त्याची उंची 6.5 मीटर असेल. 2024 मध्ये जुना पूल पाडण्यात आला असून त्यानंतर लगेच नव्या पूलाची निर्मिती सुरू झाली. हा पूल रेल्वे रुळांच्या वर असल्याने, बीएमसीने पायलिंग काम कमी करण्यासाठी आणि बांधकाम प्रक्रिया सुलभ करण्यासाठी केबल-स्टेड डिझाइनचा पर्याय निवडला होता.
हे ही वाचा: मुंबईची खबर: मुंबईकरांसाठी गूड न्यूज! लवकरच 'या' ठिकाणाहून रो-रो सेवा... काय होणार फायदा?
कधी खुला होणार सायन ब्रिज?
मुंबईतील सायन उड्डाणपुलाचं काम वेगाने सुरू असून बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) 31 मे 2026 पर्यंत ते पूर्ण करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. रेल्वे विभागाकडून सायन उड्डाणपुलाच्या दक्षिण बाजूला फूटब्रिजचं (FOB) बांधकाम सुरू आहे. पूर्वी हे काम 31 ऑगस्ट 2025 पर्यंत पूर्ण होणार असल्याची अपेक्षा होती. परंतु, कामात विलंब झाला असून आता रेल्वे प्रशासनाने फुटब्रिजचं काम 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत पूर्ण होणार असल्याची आश्वासन दिलं आहे. अशातच, हा ब्रिज पुढच्या वर्षात मे महिन्यात खुला होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
ADVERTISEMENT
