मुंबईची खबर: मध्य रेल्वेकडून 'गणपती स्पेशल ट्रेन'ची घोषणा! मात्र काही तासांतच प्रवाशांना मोठा धक्का...

मध्य रेल्वे (Central Railway) कडून गणेशोत्सवासाठी 250 विशेष गाड्या चालवण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, घोषणा केल्यानंतर केवळ एक तासातच रेल्वेला हा निर्णय मागे घ्यावा लागला.

मध्य रेल्वेकडून 'गणपती स्पेशल ट्रेन'ची घोषणा! मात्र काही तासांतच प्रवाशांना मोठा धक्का...

मध्य रेल्वेकडून 'गणपती स्पेशल ट्रेन'ची घोषणा! मात्र काही तासांतच प्रवाशांना मोठा धक्का...

मुंबई तक

• 05:21 PM • 17 Jul 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

मध्य रेल्वेकडून गणेशोत्सवासाठी विशेष गाड्यांची घोषणा

point

'मध्य रेल्वे गणपती स्पेशल ट्रेन 2025' चा निर्णय मागे

Mumbai News: मुंबईच्या मध्य रेल्वे (Central Railway) कडून गणेशोत्सवासाठी 250 विशेष गाड्या चालवण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, घोषणा केल्यानंतर केवळ एक तासातच रेल्वेला हा निर्णय मागे घ्यावा लागला. अद्याप रेल्वेने यामागचं कारण स्पष्ट केलं नाही. सोमवारी सायंकाळी या विशेष ट्रेनची घोषणा करण्यात आली होती. रेल्वेच्या या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.

हे वाचलं का?

स्पेशल ट्रेन सेवेसाठी नोटिफिकेशन जाहीर

सोमवारी मध्य रेल्वेच्या मुख्यालयाने गणपती विशेष ट्रेनबाबत नोटिफिकेशन जाहीर केलं होतं. नोटिफिकेशनमध्ये म्हटल्याप्रमाणे 22 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर दरम्यान विशेष गाड्या चालवल्या जातील. गणेशोत्सवाच्या दरम्यान गर्दी कमी करणे, हाच निर्णयामागचा हेतू होता. या नोटिफिकेशनमध्ये कोकण रेल्वेचे पत्र आणि रेल्वे बोर्डाची मान्यता असल्याचा देखील उल्लेख करण्यात आला होता. सेंट्रल रेल्वेची ही अधिसूचना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

हे ही वाचा: मीटिंगचं कारण सांगून बाहेर गेली अन् परतलीच नाही... पतीला कळाली गुवाहाटीची 'ती' गोष्ट

250 विशेष ट्रेन चालवण्याबाबत घोषणा

मध्य रेल्वेच्या गणपती विशेष गाड्यांच्या कोचिंग नोटिफिकेशन नुसार, सीएसएमटी-सावंतवाडी-सीएसएमटी, सीएसएमटी-रत्नागिरी-सीएसएमटी, एलटीटी-सावंतवाडी-एलटीटी, एलटीटी-मडगाव-एलटीटी आणि पुणे-रत्नागिरी-पुणे या मार्गांवर गाड्या धावण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. यापैकी काही मार्गांवर दररोज गणेशोत्सव विशेष गाड्या असतील तर काही मार्गांवर साप्ताहिक म्हणजेच आठवड्याला विशेष गाड्या असतील. या मार्गावर एकूण 250 विशेष गाड्या धावणार असल्याची मध्य रेल्वेची ही अधिकृत सूचना काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाली.

हे ही वाचा: आरारारारा खतरनाक! पठ्ठ्याने दारूच्या नशेत जिवंत सापाला खाल्लं..नंतर घडली सर्वात भयंकर घटना

एक तासातच अधिसूचना रद्द

मध्ये रेल्वेने हे नोटिफिकेशन रद्द केलं असल्याचं समोर आलं आहे. मुख्य प्रवासी वाहतूक व्यवस्थापकांनी मुख्य व्यावसायिक व्यवस्थापक (पॅसेंजर मार्केटिंग) यांना एक मेल पाठवला. यामध्ये 'मध्य रेल्वे गणपती स्पेशल ट्रेन 2025 भाग-1' ही 'कोचिंग अधिसूचना क्रमांक 490/2025' रद्द केली असल्याचं मानलं जावं, असं सांगण्यात आलं आहे. विशेष बाब म्हणजे एका तासाच्या आत म्हणजे सोमवारी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास, मध्य रेल्वेने अधिकृत पत्र रद्द करून तो निर्णय मागे घेतला. 

    follow whatsapp