Crime News: सध्याच्या काळात प्रेमाच्या नावाखाली बरेच तरुण आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत असतात. खरंतर, दोन प्रेम करणाऱ्या काही व्यक्तींचं नातं थेट लग्नापर्यंत पोहचतं तर काहीजण आपला स्वार्थासाठी तितकाच काळ प्रेमसंबंधांमध्ये असतात. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये प्रेमसंबंधाच्या नात्यात एका तरुणीसोबत धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. एका तरुणावर तिचं जीवापाड प्रेम होतं आणि त्याने तिला लग्नाची बरीच स्वप्ने दाखवली तसेच वचनं देखील दिली. मात्र, शेवटच्या क्षणी त्यांनी लग्नापासून माघार घेतली आणि प्रेयसीला फसवण्याचा प्रयत्न केला. यामुळे तरुणीला मोठा धक्का बसला. तिने पुढे नेमकं काय केलं?
ADVERTISEMENT
या प्रकरणातील पीडित तरुणीचं नाव रीना असून तिला तिच्या प्रियकराने धोका दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. रीनाने आपल्या प्रियकराला धडा शिकवण्याचं ठरवलं. तिने आपल्या प्रियकराच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली आणि त्याला थेट कोर्टात सादर करण्यात आलं. त्यानंतर कोर्टातून त्याची रवानगी थेट तुरुंगात करण्यात आली. रीना एका सामान्य कुटुंबात राहत असून ती आपल्या कुटुंबियांसोबत ट्रोनिक सिटीमध्ये राहते. मिळालेल्या माहितीनुसार, रीना सध्या कॉलेजमध्ये शिक्षण घेते.
सोशल मीडियावर झाली ओळख
कॉलेजमध्ये शिकत असताना ती सोशल मीडियावर सुद्धा अॅक्टिव्ह होती आणि त्याच दरम्यान इंस्टाग्रामवर तिची ओळख 21 वर्षाच्या मनीषसोबत झाली. त्यावेळी मनीषने एका कंपनीमध्ये नोकरी करत असल्याचं सांगितलं. दोघांची एकमेकांशी चांगली ओळख झाल्यानंतर त्यांनी आपले फोन नंबरसुद्धा एक्सचेंज करून घेतले. त्यावेळी दिवस-रात्र त्यांचं एकमेकांशी बोलणं होऊ लागलं आणि त्यांच्यातील मेत्रीचं प्रेमात रूपांतर झालं. त्यानंतर ते दोघे नेहमी बाहेर भेटू लागले. मनीषने रीनाला लग्नाची खोटी स्वप्नं दाखवल्याचा आरोप आहे. त्याने रीना लग्नाचं वचन दिली होतं. त्यामुळे रीना मनीषच्या बोलण्याला भुलली आणि त्या दोघांनी बऱ्याचदा शरीर संबंध बनवले.
हे ही वाचा: विधानभवनाच्या गेटसमोर जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकरांमध्ये शिवीगाळ
दरम्यान, रीनाच्या कुटुंबियांना तिच्या प्रेमप्रकरणाबद्दल कळालं आणि त्यावेळी रीनाने आपल्या कुटुंबियांना विश्वासात घेऊन मनीष आपल्याशी लग्न करणार असल्याची खात्री पटवून दिली. मनीषला याबद्दल कळताच तो रीनाशी बोलणं टाळू लागला. त्यावेळी रीनाला वाटले की कदाचित मनीष त्याच्या नोकरीमुळे तिला वेळ देऊ शकत नाही. पण दिवसेंदिवस रीनाला मनीषच्या वागण्यात बदल जाणवू लागला.
रीनाला बसला मोठा धक्का
एके दिवशी रीनाने मनीषला स्पष्टच विचारले की "तू मला का इग्नोर करत आहेस? तुझ्या आयुष्यात दुसरं कोणी आलं आहे का?" यानंतर रीनाने मनीषला त्याने लग्नाचं वचन दिलं असल्याची जाणीव करून दिली. त्यावेळी तिने मनीषला विचारले, "तु खरंच माझ्याशी लग्न करणार आहेस ना?" यावर मनीषचं उत्तर ऐकून रीनाच्या पायाखालची जमिनच सरकली.
हे ही वाचा: अंगारक योगामुळे 'या' राशीतील लोकांचं होणार मोठं नुकसान, कारणं आलं समोर, तुमची रास आहे का पाहा?
लग्न करण्यापासून घेतली माघार
रीनाच्या प्रश्नावर मनीष म्हणाला, "मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. माझे कुटुंबियांना आपलं नातं मान्य नाही. त्यामुळे तू आता माझ्यापासून दूर राहा आणि माझ्याशी कोणताही संपर्क ठेवू नकोस." रीनाने मनीषला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. पण मनीष त्याच्या निर्णयावर ठाम होता. त्यानंतर रीनाने हे सर्व प्रकरण तिच्या कुटुंबियांना सांगितले. 29 जून रोजी ती थेट पोलिस स्टेशनला गेली आणि तिथे तिने तिच्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल पोलिसांना सांगितलं. त्यावेळी मनीषने आपला फक्त वापर करून घेतल्याचं तिने पोलिसांना सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी मनीषला अटक केली आणि त्याला कोर्टात हजर करण्यात आलं. या सगळ्यानंतर मनीषची रवानगी थेट तुरुंगात करण्यात आली.
ADVERTISEMENT
