अंघोळ करताना काढले व्हिडीओ अन् घरी जाऊन तिच्यासोबत... त्या महिलेसोबत नेमकं काय घडलं?

लखनऊच्या बंधारा परिसरात एका पुरोहितच्या पत्नीसोबत धक्कादायक प्रकार घडला. आरोपीकडून तिचे अंघोळ करताना व्हिडीओ काढण्यात आले आणि शारीरिक अत्याचार करण्यात आला.

अंघोळ करताना काढले व्हिडीओ अन् घरी जाऊन तिच्यासोबत...

अंघोळ करताना काढले व्हिडीओ अन् घरी जाऊन तिच्यासोबत...

मुंबई तक

• 12:19 PM • 16 Jul 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

महिलेचे अंघोळ करताना काढले व्हिडीओ

point

व्हिडीओ दाखवून धमकी देत शारीरिक शोषण

point

महिलेसोबत नेमकं काय घडलं?

Crime News: लखनऊच्या बंधारा परिसरात राहणाऱ्या एका पुरोहितच्या पत्नीसोबत धक्कादायक प्रकार घडल्याची बातमी समोर आली आहे. तिचे पती कामानिमित्त नेहमी घराबाहेर असायचे. 35 वर्षीय महिला आपल्या दोन मुलांसोबत घरीच राहायची. त्यांच्या घरात पेशाने सोनार असलेल्या 24 वर्षीय तरुणाचं सतत येण-जाणं असायचं. त्या घरात महिलेसोबत नेमकं काय घडलं? सविस्तर जाणून घ्या.

हे वाचलं का?

अंघोळ करताना काढले व्हिडीओ अन् धमकी  

एके दिवशी त्या तरुणाने पुरोहितची पत्नी अंघोळ करत असताना तिचे व्हिडीओ काढले. तो तरुण सतत महिलेला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार करत होता. त्या तरुणाकडून महिलेला ब्लॅकमेल करत तिचं शारीरिक शोषण केलं जात होतं. एके दिवशी आरोपी महिलेसोबत बळजबरीने शारीरिक संबंध बनवताना पुरोहित आपल्या घरात पोहचले आणि त्या आरोपीला रंगेहाथ पकडलं.

हे ही वाचा: Sana Malik, Sneha Dube Mumbai Tak Baithak 2025: 'अजितदादांनी सांगितलंय, अजिबात सेक्युलर विचार सोडणार नाही', सना मलिक स्पष्टच बोलल्या!

आरोपीला रंगेहाथ पकडलं... 

मिळालेल्या माहितीनुसार, प्रकरणातील पीडिता ही भितीमुळे बराच काळ गप्प राहिली. पीडिताने मंगळवारी बंधारा पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची तक्रार दाखल केली. प्रकरणातील आरोपी तरुणाचं पुरोहितच्या घरी सतत येणं-जाणं होतं. त्यावेळी शेजाऱ्यांनी याबद्दल पुरोहितला सांगितलं. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून पुरोहित लगेच घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी आरोपीला रंगेहाथ पकडलं. त्यावेळी आरोपीने पुरोहितला जीवे मारण्याची धमकी दिली आणि घरातून पळून गेला.

हे ही वाचा: चालत्या बसमध्ये झाली डिलीव्हरी! नंतर नवजात बाळाला खिडकीतून... हादरवून टाकणारी घटना

पोलिसांची कारवाई  

पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी याबद्दल तक्रार दाखल केली असून प्रकरणाचा तपास सुरू आहे. आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांकडून छापे टाकले जात आहेत.

    follow whatsapp