Govt Jobs : रेल्वेकडून 6,565 पदांसाठी भरती जाहीर, कसा कराल अर्ज?

टेक्निशियन पदासाठी रेल्वेकडून मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी अर्जप्रक्रिया 30 जून पासून सुरु होणार आहे. यासाठी पात्रतेचे निकष काय आहेत, जाणून घ्या.

RRB Recruitment

RRB Recruitment

मुंबई तक

• 05:00 PM • 27 Jun 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

Govt Jobs : रेल्वेकडून 6,565 पदांसाठी भरती जाहीर

point

कसा कराल अर्ज?

RRB Recruitment : रेल्वे भरती बोर्डाने टेक्निशियन पदाची मोठी भरती जाहीर केली आहे. तब्बल 6565 जागांसाठी ही भरती होणार आहे. यासाठी अर्ज करण्याची सुरुवात 30 जून 2026 पासून  होणार आहे. यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. टेक्निशियन ग्रेड 1 साठी 323 तर टेक्निशियन ग्रेड 3 साठी 6242 रिक्त पदं भरली जाणार आहेत. रेल्वेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही महत्त्वाची भरती आहे.

हे वाचलं का?

शैक्षणिक पात्रता काय?

या भरतीसाठी पदांनुसार वेगवेगळ्या शैक्षणिक पात्रतेची अट ठेवण्यात आली आहे. 'टेक्निशियन ग्रेड 1' पदासाठी उमेदवारांकडे फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स, आयटी किंवा इन्स्ट्रुमेंटेशन यापैकी एका विषयात बी.एस्सी. पदवी असणे आवश्यक आहे किंवा संबंधित विषयातील इंजिनिअरिंगची पदवी किंवा डिप्लोमा असणे बंधनकारक आहे. दुसरीकडे, 'टेक्निशियन ग्रेड 3' पदासाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण असावा आणि त्याच्याकडे एनसीव्हीटी (NCVT) किंवा एससीव्हीटी (SCVT) मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित ट्रेडमधील आयटीआय (ITI) प्रमाणपत्र किंवा ॲक्ट अप्रेंटिसशिप पूर्ण केलेली असणे गरजेचे आहे.

हे ही वाचा : TET पेपर लीक प्रकरण : तिघांना अटक, मुख्य आरोपी फरार, 1.5 कोटींचा रेट

पगार किती मिळणार?

या दोन्ही पदांसाठी वयोमर्यादा आणि आकर्षक वेतनश्रेणी देखील निश्चित करण्यात आली आहे. टेक्निशियन ग्रेड 1 पदासाठी उमेदवाराचे वय 18 ते 36 वर्षे, तर टेक्निशियन ग्रेड 3 पदासाठी 18 ते 33 वर्षे असणे आवश्यक आहे. सरकारी नियमांनुसार आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत विशेष सवलत दिली जाणार आहे. वेतनाचा विचार केल्यास, सातव्या वेतन आयोगानुसार टेक्निशियन ग्रेड 1 ला लेव्हल 5 अंतर्गत 29,200 रुपये आणि टेक्निशियन ग्रेड 3 ला लेव्हल 2 अंतर्गत 19,900 रुपये सुरुवातीचे मूळ वेतन मिळेल. याव्यतिरिक्त रेल्वेच्या नियमांनुसार महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA) आणि प्रवास भत्ता (TA) यांसारख्या इतर सुविधाही दिल्या जातील.

हे ही वाचा : आप नेत्या नंदानी यांचा मृतदेह आढळला, विवाहित बॉयफ्रेंडवर खून केल्याचा आरोप

अर्ज करण्याची शेवटची तारीख

या सुवर्णसंधीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या सर्व पात्र उमेदवारांनी निर्धारित अटी पूर्ण करणे अनिवार्य आहे. या भरतीची सविस्तर माहिती आणि अर्ज करण्याची प्रक्रिया रेल्वे भरती बोर्डाच्या www.rrbcdg.gov.in या अधिकृत वेबसाइटवर तसेच विविध प्रादेशिक आरआरबी वेबसाइट्सवर उपलब्ध होईल. उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचून घ्यावी आणि शेवटच्या तारखेची वाट न पाहता वेळेत आपले अर्ज दाखल करावेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत 29 जुलै आहे.