नागपूर : नवऱ्याला घटस्फोट दिला, अन् दुसऱ्याच दिवशी महिलेची हत्या, नेमकं काय घडलं?

nagpur crime news : नागपुरच्या कामठी परिसरात 40 वर्षीय महिलेची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली. घटनेनंतर पतीवर संशय व्यक्त करण्यात आला असून तो सध्या फरार आहे.

nagpur crime news

nagpur crime news

योगेश पांडे

27 Jun 2026 (अपडेटेड: 27 Jun 2026, 01:38 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

नागपूर : नवऱ्याला घटस्फोट दिला,

point

अन् दुसऱ्याच दिवशी महिलेची हत्या, नेमकं काय घडलं?

nagpur crime news : नागपूर शहरातील कामठी परिसरात शुक्रवारी सायंकाळी 40 वर्षीय महिलेची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी प्राथमिक तपासात या हत्येमागे कौटुंबिक वादाचे कारण असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. या प्रकरणात मृत महिलेच्या पतीवर संशय व्यक्त करण्यात आला असून घटना घडल्यानंतर तो फरार झाला आहे. मृत महिलेची ओळख  मंजू राजकुमार पारसे (वय 40, रा. पुलगाव, पाचखेड) अशी झाली आहे. ही घटना जुनी कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिरणवार गल्लीतील शुक्रवार बाजारजवळच्या दरोगा मशिदीजवळ घडली.

हे वाचलं का?

हेही वाचा : गर्लफ्रेंडच्या भावाला बॉयफ्रेंडने 40 अश्लील फोटो-व्हिडीओ पाठवले, सकाळी दोघांची बॉडी सापडली

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेवर धारदार शस्त्राने अनेक वार करण्यात आले. या हल्ल्यात तिच्या छातीला गंभीर दुखापत झाली आणि घटनास्थळीच तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या हत्येमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा : उद्धव ठाकरेंनी भर सभेत 'मुंबई Tak' चा व्हिडीओ दाखवला, म्हणाले,"आईची शपथ घेऊन गद्दारी"

कौटुंबिक वादातूनच हत्येची घटना घडल्याचा संशय

पोलिसांच्या प्राथमिक तपासात मृतका मंजू पारसे आणि तिचा पती राजकुमार पारसे यांच्यात दीर्घकाळापासून कौटुंबिक वाद सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी पतीला मद्यपानाचे व्यसन असल्यामुळे दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याचेही तपासात समोर आले आहे. विशेष म्हणजे, या घटनेच्या अवघ्या एक दिवस आधीच दोघांचा न्यायालयातून घटस्फोट झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे या कौटुंबिक वादातूनच हत्येची घटना घडली असावी, असा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

घटनेनंतर संशयित पती राजकुमार पारसे फरार

घटनेनंतर संशयित पती राजकुमार पारसे फरार झाला असून त्याचा शोध घेण्यासाठी जुनी कामठी पोलिसांनी विशेष पथकाची स्थापना केली आहे. संभाव्य ठिकाणी त्याचा शोध सुरू असून तपास वेगाने सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दिघे यांनी या प्रकरणातील सर्व पैलूंची सखोल चौकशी सुरू असल्याचे सांगितले. तसेच आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.