मुंबईची खबर: रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मध्य रेल्वेवर धावणाऱ्या 15 डब्यांच्या ट्रेनची संख्या वाढणार...

मध्य रेल्वेवर धावणाऱ्या 15 डब्यांच्या लोकल ट्रेनची संख्या वाढणार असल्याची माहिती आहे. यामध्ये जलद (फास्ट) आणि धीमी (स्लो) अशा दोन्ही लोकल ट्रेनचा समावेश असणार आहे.

मध्य रेल्वेवरील 15 डब्यांच्या ट्रेनची संख्या वाढणार...

मध्य रेल्वेवरील 15 डब्यांच्या ट्रेनची संख्या वाढणार...

मुंबई तक

• 03:10 PM • 12 Nov 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी

point

मध्य रेल्वेवर धावणाऱ्या 15 डब्यांच्या ट्रेनची संख्या वाढणार...

Mumbai News: मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वेवर धावणाऱ्या 15 डब्यांच्या लोकल ट्रेनची संख्या वाढणार असल्याची माहिती आहे. यामध्ये जलद (फास्ट) आणि धीमी (स्लो) अशा दोन्ही लोकल ट्रेनचा समावेश असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डिसेंबर 2025 पर्यंत मध्य रेल्वेच्या 27 स्थानकांच्या विस्ताराचं काम पूर्ण होणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर, मध्य रेल्वेवर धावणाऱ्या 15 डब्यांच्या लोकल ट्रेनमध्ये वाढ होणार असल्याचं सांगितलं जात आहे. सुरूवातीच्या टप्प्यात, सध्या 12 डब्यांसह धावणाऱ्या अंदाजे 10 गाड्या 15 डब्यांमध्ये अपग्रेड केल्या जातील. टप्प्याटप्प्याने, 15 डब्यांच्या लोकल ट्रेनची संख्या वाढवली जाणार आहे. 

हे वाचलं का?

34 स्थानकांच्या विस्तारीकरणाचं काम...

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सध्या एमएमआरमध्ये 34 रेल्वे स्थानकांच्या एक्सटेंशनचं काम केलं जात आहे. यामधील, 27 स्टेशनचं काम डिसेंबरच्या अखेरीस पूर्ण होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे, 15 डब्यांच्या अधिक लोकल ट्रेन चालवणं शक्य होणार आहे. तसेच, एका लोकलमध्ये अधिक प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. कल्याण, खोपोली आणि कसारा ही अतिरिक्त स्थानकांचा या यादीत समावेश केला जाणार आहे. यामुळे, या भागात राहणाऱ्या प्रवाशांसाठी प्रवास अधिक आरामदायी होणार असल्याची माहिती आहे. 

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील 34 रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म विस्ताराचे काम सुरू आहे. यापैकी 27 स्थानकांच्या एक्स्टेंशनचं काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यानंतर 15 डब्यांच्या लोकल ट्रेनची संख्या वाढवली जाईल.

हे ही वाचा: Govt Job: 'बँक ऑफ बडोदा'मध्ये तब्बल 2700 पदांसाठी भरती! तरुणांनी अजिबात संधी सोडू नका...

'या' स्थानकांचा समावेश 

या यादीत या यादीत विठ्ठलवाडी, उल्हासनगर, कर्जत, खोपोली, अंबरनाथ, आंबिवली, वाशिंद, आसनगाव, आटगाव, शैलू, बदलापूर, भिवपुरी, पळसधरी, मुंब्रा, कोपर, कळवा, शहाड, ठाकुर्ली, कसारा, टिटवाळा आणि इतर काही स्थानकांचा समावेश आहे. तसेच, ज्या 7 स्थानकांच्या विस्तारीकरणाच्या कामाला अधिक वेळ लागणार आहे, त्यात सीएसएमटी, ठाणे, कल्याण, डोंबिवली, वांगणी खडवली आणि दावणगेरे स्थानके समाविष्ट आहेत.

नवीन वर्षात नवं वेळापत्रक 

दरवर्षी, नोव्हेंबर महिन्यात रेल्वेचं वेळापत्रक अपडेट केलं जातं. मात्र, यावर्षी स्टेशन एक्सटेंशनचं काम सुरू असल्यामुळे हे अपडेट होऊ शकलं नाही. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, स्थानकांच्या विस्तारीकरणाचं काम पूर्ण झाल्यानंतर नवीन सालात नवं वेळापत्रक जाहीर केलं जाईल. 

हे ही वाचा: Delhi Blast: डॉ. मुझम्मिलसोबत प्रेमसंबंध! पतीपासून घेतला घटस्फोट, डॉ. शाहीन शाहीदचं महाराष्ट्रातील कनेक्शन आलं समोर...

लवकरच, एका नव्या एसी लोकल ट्रेनचा सुद्धा मध्य रेल्वेत समावेश होणार आहे. ही नवी लोकल येत असल्याने एसी सर्व्हिसमध्ये सुद्धा वाढ होणार असल्याचं सांगितलं जात आहे. वर्तमानात मध्य रेल्वेजवळ 6 एसी (वातानुकूलित) लोकल ट्रेन असून याच्या 80 फेऱ्या निश्चित आहेत. आता ही नवीन एसी लोकल हार्बर लाईनवर चालवली जाईल की मेन लाईनवर, याबद्दल कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.

    follow whatsapp