कोल्हापूर : रंगपंचमीदिवशी तरुणीचा दारु पिऊन धिंगणा, पोलीसाच्या हाताला चावा घेतला, डोळ्याजवळ नखांनी ओरबडलं

Kolhapur Crime News : मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित युवती स्वतः गाडी चालवत होती. पोलिसांनी तिला रोखण्याचा प्रयत्न केला असता, तिने तिथे उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांशी बाचाबाची करण्यास सुरुवात केली. ही बाचाबाची इतकी वाढली की, दारूच्या नशेत असलेल्या या युवतीने थेट पोलिसांनाच अश्लील शिवीगाळ केली. एवढ्यावरच न थांबता, तिने ड्युटीवर असलेल्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्यावर धावून जाऊन त्यांच्या हाताला जोरात चावा घेतला.

Kolhapur Crime News

Kolhapur Crime News

मुंबई तक

09 Mar 2026 (अपडेटेड: 09 Mar 2026, 12:22 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

कोल्हापूर : रंगपंचमीदिवशी तरुणीचा दारु पिऊन धिंगणा

point

पोलीसाच्या हाताला चावा घेतला, डोळ्याजवळ नखांनी ओरबडलं

Kolhapur Crime News : कोल्हापूरमध्ये रंगपंचमीच्या उत्सवादरम्यान विचित्र प्रकार घडलेला पाहायला मिळालाय. आर के नगर परिसरात एका युवतीने दारूच्या नशेत प्रचंड धिंगाणा घातला असून, तिने चक्क महिला पोलीस कर्मचाऱ्याचा हाताला चावा घेतल्याचा प्रकार घडला आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, यामुळे शहरात खळबळ माजली आहे.

हे वाचलं का?

कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी ८ मार्च रोजी ठिकठिकाणी रंगपंचमी साजरी करण्यात येत होती. नागरिक रंगांची उधळण करत होते आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, याच काळात आर के नगर परिसरात एका युवक आणि युवतीने मद्याच्या नशेत बेधुंद होऊन गोंधळ घालण्यास सुरुवात केली. हे दोघेही मोटरसायकलवरून जात असताना अतिशय बेधुंद स्थितीत होते. आर के नगर रोडवर रंगपंचमीनिमित्त पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तरीही या युवतीने भररस्त्यात शिवीगाळ करत धिंगाणा घातला.

हेही वाचा : पॅरोलवर बाहेर आला अन् भररस्त्यात बायकोवर केला गोळीबार, बायकोवर कशाचा राग होता?

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित युवती स्वतः गाडी चालवत होती. पोलिसांनी तिला रोखण्याचा प्रयत्न केला असता, तिने तिथे उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांशी बाचाबाची करण्यास सुरुवात केली. ही बाचाबाची इतकी वाढली की, दारूच्या नशेत असलेल्या या युवतीने थेट पोलिसांनाच अश्लील शिवीगाळ केली. एवढ्यावरच न थांबता, तिने ड्युटीवर असलेल्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्यावर धावून जाऊन त्यांच्या हाताला जोरात चावा घेतला. तसेच संबंधित महिला कर्मचाऱ्याच्या डोळ्याजवळ नख्यांनी ओरबडून त्यांना जखमी केले. भररस्त्यात घडलेला हा प्रकार पाहून नागरिकही अवाक झाले होते.

या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत या युवक आणि युवतीला ताब्यात घेतले. त्यांना आर के नगर येथील पोलीस चौकीत आणण्यात आले, मात्र तिथेही या युवतीचा अवतार कायम होता. पोलीस चौकीच्या आवारातही तिने मोठा धिंगाणा घातला आणि पोलिसांशी हुज्जत घातली. या सर्व प्रकाराचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. रंगांच्या उत्सवात अशा प्रकारे मद्यधुंद अवस्थेत महिला पोलिसावर हल्ला होण्याच्या घटनेमुळे कोल्हापूर नेमके कुठे चालले आहे, असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

बीड : अपघातानंतर मुलगा ब्रेन डेड झाला, बापाचा काळजावर दगड ठेऊन मोठा निर्णय, अनेकांना देणार जीवनदान!
 

    follow whatsapp