मुंबईची खबर: भारतातील पहिला बुलेट ट्रेन प्रोजेक्ट प्रगतीपथावर! पहिल्या रूटचं काम अंतिम टप्प्यात...

भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेन कॉरिडोरचं काम वेगाने सुरू असल्याचं वृत्त समोर आलं आहे. सूरत आणि बिलिमोरा दरम्यान, 47 किमी लांबीच्या मार्गाचं काम अंतिम टप्प्यात आहे.

पहिल्या रूटचं काम अंतिम टप्प्यात...

पहिल्या रूटचं काम अंतिम टप्प्यात...

मुंबई तक

• 05:10 PM • 30 Nov 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

भारतातील पहिला बुलेट ट्रेन प्रोजेक्ट प्रगतीपथावर!

point

बुलेट ट्रेन प्रोजेक्टच्या पहिल्या रूटचं काम अंतिम टप्प्यात...

Mumbai News: भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेन कॉरिडोरचं काम वेगाने सुरू असल्याचं वृत्त समोर आलं आहे. 508 किमी लांबीचा मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर गुजरात, महाराष्ट्र तसेच दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातून जाईल. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या प्रकल्पाबाबत ही मोठी अपडेट दिली आहे. सूरत आणि बिलिमोरा दरम्यान, 47 किमी लांबीच्या मार्गाचं काम अंतिम टप्प्यात आहे. या विभागातील सर्व बांधकामे आणि ट्रॅक-बेड टाकण्याचं काम पूर्ण झालं आहे. 

हे वाचलं का?

आतापर्यंत 326 किमी एलिव्हेटेड ब्रिजवर काम पूर्ण झालं असून 25 पैकी 17 नदी पूल बांधण्यात आले असल्याचं रेल्वे मंत्रालयाने एका निवेदनात म्हटलं आहे. तसेच, सूरत ते बिलीमोरा मार्ग 2027 पर्यंत खुला होणार असल्याचं देखील रेल्वे मंत्र्यांनी सांगितलं आहे. बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा सूरत ते वापी असे 100 किमी अंतर पार करेल.

हे ही वाचा: पाळीव बुलडॉगने 4 वर्षांच्या चिमुकलीवर केला जीवघेणा हल्ला! केस आणि त्वचा ओरबाडली... अखेर, मुलीचा दुर्दैवी मृत्यू

ठाणे-मुंबईत कधी पोहोचणार? 

यापूर्वी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रोजेक्ट डिसेंबर 2029 पर्यंत पूर्ण होणार आहे. बुलेट ट्रेन सेवा 2028 पर्यंत ठाणे आणि 2029 पर्यंत मुंबईत पोहोचणार असल्याचं देखील रेल्वे मंत्र्यांनी सांगितलं. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरमध्ये एकूण 12 स्थानके असतील. यामध्ये मुंबई, ठाणे, विरार, बोइसर, वापी, बिलिमोरा, सूरत, भरूच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद आणि साबरमती या स्थानकांचा समावेश आहे. 

हे ही वाचा: Govt Job: 12 वी पास तरुणांसाठी रेल्वेत नोकरीची संधी! 3000 हून अधिक पदांसाठी भरती, लवकरच करा अर्ज...

मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल कॉरिडॉरची प्रगती   

गेल्या काही दिवसांत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरतमध्ये बांधल्या जाणाऱ्या बुलेट ट्रेन स्टेशनला भेट दिली आणि मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल कॉरिडॉरची प्रगती पाहिली. सूरत स्टेशनची डिझाइन शहराच्या जगप्रसिद्ध डायमंड उद्योगापासून प्रेरित आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने स्टेशन डिझाइन केलं गेलं आहे. यामध्ये मोठे वेटिंग लाउंज, शौचालय आणि रिटेल आउटलेट आहे. हे सुरत मेट्रो, सिटी बस सर्व्हिस आणि इंडियन रेल्वे नेटवर्कला सुलभ मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटी देखील प्रदान करेल.