मुंबईची खबर: मुंबईच्या कोस्टल रोडवर भारतातील पहिला 'म्यूझिकल रोड'! वाहनचालकांना अनोखा फील...

मुंबई तक

• 03:50 PM • 13 Feb 2026

मुंबईच्या कोस्टल रोडवर भारतातील पहिला म्यूझिकल रोड तयार करण्यात आला आहे. कोस्टल रोडवरून नरिमन पॉइंटहून वरळीकडे जाणाऱ्या वाहनचालकांना रस्त्यावर खास बसवलेल्या म्यूझिकल स्ट्रिप्समुळे एक अनोखा ड्रायव्हिंग अनुभव मिळेल.

मुंबईत भारतातील पहिला 'म्यूझिकल रोड'!

मुंबईत भारतातील पहिला 'म्यूझिकल रोड'!

Google CTA

बातम्या हायलाइट

point

मुंबईतील कोस्टल रोडवर भारतातील पहिला 'म्यूझिकल रोड'!

point

वाहनचालकांना मिळणार अनोखा फील...

Mumbai News: मुंबईच्या कोस्टल रोडवर भारतातील पहिला म्यूझिकल रोड तयार करण्यात आला आहे. कोस्टल रोडवरून नरिमन पॉइंटहून वरळीकडे जाणाऱ्या वाहनचालकांना रस्त्यावर खास बसवलेल्या म्यूझिकल स्ट्रिप्समुळे एक अनोखा ड्रायव्हिंग अनुभव मिळेल. जापान आणि दुबईसारख्या देशांमध्ये असे रस्ते असून म्युजिकल रोड असलेलं मुंबई हे भारतातील पहिलं शहर ठरलं आहे. 

हे वाचलं का?

'जय हो' हे गाणं 

ट्रॅफिक-फ्री, जलद आणि आरामदायी प्रवासासाठी ओळखल्या जाणाऱ्या मुंबई कोस्टल रोडवर आता एक खास टेक्नो म्युझिक लेन बनवण्यात आली आहे. या म्युझिक लेनमधून वाहने जाताना त्यांना 'स्लमडॉग मिलेनियर' चित्रपटातील 'जय हो' हे गाणं ऐकू येईल. हा जगातील पाचवा आणि भारतातील पहिला प्रयोग असल्याचं सांगितलं जात आहे. 2007 साली जपानमध्ये अभियंता शिजुओ शिनोडा यांनी हे तंत्रज्ञान शोधलं. त्यावेळी त्यांना बुलडोजरच्या कामातून तयार झालेला ध्वनी प्रभाव ऐकू आला. 

'मेलडी रोड' संकल्पना 

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, रस्त्यावर विशिष्ट अंतराने खांब किंवा पट्ट्या बनवल्या जातात आणि जेव्हा वाहने विशिष्ट वेगाने त्यावरून जातात तेव्हा टायर्सच्या घर्षणामुळे ध्वनी लहरी निर्माण होतात. ही संकल्पना नंतर 'मेलडी रोड' म्हणून ओळखली जाऊ लागली आणि असेच प्रयोग अखेर हंगेरी, जपान, दक्षिण कोरिया आणि संयुक्त अरब अमीरातमध्ये करण्यात आले. 'जय हो' ही धून देशाला समर्पित करणारी आहे तसेच ती लोकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करत असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. 

हे ही वाचा: गोव्याच्या किनाऱ्यावर फुल्ल दारु प्यायले, समोर रशियन महिला दिसताच नराधमांमधील राक्षस जागा, नको ते करण्याचा प्रयत्न..

हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एका हंगेरियन कंपनीला नियुक्त करण्यात आलं. कंपनीने नरिमन पॉइंट ते वरळी या उत्तरेकडील मार्गावर, पहिल्या लेनपासून सुमारे 500 मीटर अंतरावरीव दुभाजकाजवळ संगीत म्हणजेच म्यूझिकल स्ट्रिप्स बसवले. जेव्हा वाहनचालक 70 ते 80 किमी प्रतितास वेगाने वरळीच्या दिशेने अंडरग्राउंड बोगद्यातून बाहेर पडतात, तेव्हा त्यांना त्यांच्या गाडीतून म्यूजिक स्पष्टपणे ऐकू येईल.