मुंबईची खबर: दीड तासांचा प्रवास आता केवळ 15 मिनिटांत... 'या' मार्गाला जोडलं जाणार ठाणे-बोरीवली ट्विन टनल!

ठाणे-बोरीवली ट्विन टनल हा मुंबईतील रहिवाशांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट असल्याचं सांगितलं जात आहे. या प्रोजेक्टचं काम वेगाने सुरू असून काम पूर्ण झाल्यानंतर लाखो प्रवाशांचा प्रवास सोयीस्कर होणार असल्याची माहिती आहे.

'या' मार्गाला जोडलं जाणार ठाणे-बोरीवली ट्विन टनल!

'या' मार्गाला जोडलं जाणार ठाणे-बोरीवली ट्विन टनल!

मुंबई तक

• 03:53 PM • 06 Nov 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

दीड तासांचा प्रवास आता केवळ 15 मिनिटांत...

point

'या' मार्गाला जोडलं जाणार ठाणे-बोरीवली ट्विन टनल!

Mumbai News: ठाणे-बोरीवली ट्विन टनल हा मुंबईतील रहिवाशांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट असल्याचं सांगितलं जात आहे. या प्रोजेक्टचं काम वेगाने सुरू असून काम पूर्ण झाल्यानंतर लाखो प्रवाशांचा प्रवास सोयीस्कर होणार असल्याची माहिती आहे. ठाण्यातील बहुतेक भूसंपादन (सार्वजनिक उद्देशांसाठी जमीन संपादन करण्याची प्रक्रिया) पूर्ण झालं असून बोरिवलीतील प्रकल्पग्रस्त व्यक्तींचे (पीएपी) पुनर्वसन सध्या प्रगतीपथावर असल्याची माहिती प्राधिकरणाने दिली. घोडबंदर रोडला वेस्टर्न एक्सप्रेस हायवेशी जोडणारा मुख्य मार्ग हा 11.8 किमी लांबीच्या जुळा बोगदा (ट्विन टनल) मुळे ठाण्यातील घोडबंदर रोडला वेस्टर्न एक्सप्रेस हायवेशी थेट जोडला जाणार आहे. यामुळे दोन मुख्य उपनगरांमधील प्रवास आणखी जलद आणि सुरळीत होणार असल्याचं सांगितलं जात आहे. 

हे वाचलं का?

प्रत्येक बोगद्यात तीन लेन...

हा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर, एक ते दीड तासांचा प्रवास जवळपास 15 मिनिटात करता येणार असल्याची अपेक्षा आहे. यामुळे, मुंबईतील नेहमीची वाहतूक कोंडी सुद्धा कमी होणार आहे. हे बोगदे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून जाणार आहेत. प्रत्येक बोगद्यात तीन लेन असून यामध्ये एक आपत्कालीन लेन सुद्धा समाविष्ट आहे. तसेच, सुरक्षिततेसाठी प्रत्येक 300 मीटर अंतरावर क्रॉस-पास असतील. 

या प्रोजेक्टच्या डिझाइनमध्ये व्हेंटिलेशन सिस्टम, अग्निशमन उपकरण, स्मोक डिटेक्टर आणि स्पष्ट नेव्हिगेशनसाठी एलईडी साइनबोर्ड सारख्या आधुनिक सुरक्षा सुविधांचा देखील समावेश आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या दोन्ही बोगद्यांमुळे प्रवासाचा वेळ तर कमी होणारच आहे, पण याव्यतिरिक्त प्रदूषण आणि वाहनांची गर्दी कमी करण्यासाठी सुद्धा मदत होणार आहे. 

हे ही वाचा: Govt Job: भारत सरकारच्या या वैद्यकीय संस्थेत सहभागी व्हा... मोठ्या पदांसाठी निघाली भरती! जाणून घ्या, सविस्तर माहिती

प्रोजेक्टचं काम तीन टप्प्यांत होणार 

बोरीवली-ठाणे ट्विन टनल प्रोजेक्टचं काम तीन टप्प्यांत केलं जात आहे. पॅकेज 1 मध्ये बोरीवली आणि ठाणे दरम्यान 5.75 किलोमीटर लांबीचा बोगदा बांधला जाईल. पॅकेज 2 अंतर्गत, ठाणे आणि बोरीवली दरम्यान, 6.5 किलोमीटर लांबीचा बोगदा निर्माण केला जाणार आहे. तसेच, पॅकेज 3 अंतर्गत मार्गांवर व्हेंटिलेशन सिस्टम आणि इतर उपकरणे लावण्यात येतील. MMRDA ने ही योजना तीन वर्षांमध्ये पूर्ण करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून जाणारा हा बोगदा पश्चिम एक्सप्रेस महामार्ग थेट ठाण्यातील पूर्व एक्स्प्रेस महामार्गाशी जोडला जाणार आहे. 

हे ही वाचा: मुलीचा साखरपुडा थाटात का केला? अखेर इंदुरीकर महाराजांचे स्पष्टीकरण; म्हणाले, 'बऱ्याच लोकांची तक्रार..'

या डबल बोगद्याच्या प्रोजेक्टची एकूण किंमत अंदाजे 14,401 कोटी रुपये आहे. एकूण खर्चापैकी राज्य सरकार 1,144.60 कोटी रुपये खर्च करणार आहे, तसेच केंद्र सरकार 572.30 कोटी रुपये खर्च करणार असल्याची माहिती आहे. याशिवाय, भूसंपादनासाठी 700 कोटी खर्च येणार असल्याची माहिती आहे.

    follow whatsapp