Govt Job: भारत सरकारच्या या वैद्यकीय संस्थेत सहभागी व्हा... मोठ्या पदांसाठी निघाली भरती! जाणून घ्या, सविस्तर माहिती
सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च होमिओपॅथी (CCRH)कडून ग्रुप-A, B आणि C या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
भारत सरकारच्या या वैद्यकीय संस्थेत सहभागी व्हा...
मोठ्या पदांसाठी निघाली भरती!
Govt Job: भारत सरकारच्या केंद्रीय होमिओपॅथी संशोधन परिषद या मोठ्या संस्थेत सहभागी होण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च होमिओपॅथी (CCRH)कडून ग्रुप-A, B आणि C या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी अर्जाची प्रक्रिया 5 नोव्हेंबर पासून सुरू झाली आहे. CCRH मध्ये रिसर्च ऑफिसर, जूनिअर लायब्रेरिअन किंवा एक्स-रे टेक्निशिअन म्हणून काम करण्यासाठी इच्छुक असलेले उमेदवार यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. या भरतीच्या माध्यमातून एकूण 90 उमेदवारांची निवड केली जाणार असून पात्र उमेदवार 26 नोव्हेंबर 2025 पर्यंत अर्ज करू शकतात.
शैक्षणिक पात्रता
CCRH च्या ग्रुप-A, B आणि C पदांवर भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून 12 वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे, याव्यतिरिक्त, उमेदवारांकडे संबंधित विषयात पदवी (ग्रॅज्युएशन) किंवा पदव्युत्तर (पोस्ट ग्रॅज्युएशन) डिग्री असणं गरजेचं आहे.
वयोमर्यादा
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पदांनुसार उमेदवारांसाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. पदांनुसार, 18 वर्षे, 25 वर्षे, 27 वर्षे आणि 40 वर्षे अशी कमाल वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. याशिवाय, सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात येईल. म्हणजेच एससी (SC) आणि एसटी (ST) प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे, ओबीसी (OBC) प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षे आणि अपंग उमेदवारांना 10 वर्षे उच्च वयोमर्यादेत सूट दिली जाईल.
हे ही वाचा: "माझ्याशी चॅट करा अन् कोणत्याही समस्येपासून सुटका मिळवा..." इंस्टाग्रामवर असं बोलून लुबाडले तब्बल 78 लाख!
कशी होईल निवड?
1. ग्रुप-A पदावर उमेदवारांची नियुक्ती करण्यासाठी कंप्यूटर बेस्ट टेस्ट (CBT) आयोजित केली जाईल. यामध्ये उमेदवारांना एकूण 150 प्रश्न विचारले जातील. त्यानंतर, लेखी परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांची 30 गुणांसाठी मुलाखत घेतली जाईल. याच आधारे उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल.










