"माझ्याशी चॅट करा अन् कोणत्याही समस्येपासून सुटका मिळवा..." इंस्टाग्रामवर असं बोलून लुबाडले तब्बल 78 लाख!

मुंबई तक

सायबर भामट्याने इंस्टाग्राम यूजरला फसवून त्याच्याकडून तब्बल 78 लाख रुपये लुबाडल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीविरुद्ध कारवाई करत आरोपीना सायबर फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.

ADVERTISEMENT

इंस्टाग्रामवर 'असं' बोलून लुबाडले तब्बल 78 लाख!
इंस्टाग्रामवर 'असं' बोलून लुबाडले तब्बल 78 लाख!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

"माझ्याशी चॅट करा अन् कोणत्याही समस्येपासून सुटका मिळवा..."

point

इंस्टाग्रामवर असं बोलून लुबाडले तब्बल 78 लाख!

Crime News: कर्नाटकच्या मंगलुरू शहरातून मोठ्या सायबर फ्रॉडचा खुलासा झाल्याची बातमी समोर आली आहे. सायबर भामट्याने इंस्टाग्राम यूजरला फसवून त्याच्याकडून तब्बल 78 लाख रुपये लुबाडल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीविरुद्ध कारवाई करत आरोपीना सायबर फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीचं नाव वासुदेवन आर असून तो लोकांच्या समस्या सोडवण्याच्या नावाखाली त्यांना फसवायचा आणि डिजिटल माध्यमातून त्यांच्याकडून पैसे उकळायचा. नेमकं प्रकरण काय? सविस्तर जाणून घ्या. 

इंस्टाग्रामवरून लोकांशी संपर्क साधायचा अन्...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने लोकांच्या वैयक्तिक समस्या धार्मिक विधींद्वारे लगेच सोडवण्याचा दावा केला. यासाठी त्याने एक इंस्टाग्राम अकाउंट देखील तयार केलं आणि समस्या सोडवण्याच्या नावाखाली लोकांना त्याच्या जाळ्यात अडकवलं. आरोपी इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरूनच लोकांशी संपर्क साधायचा आणि त्यांच्याशी गोड गोड बोलून त्यांच्या वैयक्तिक समस्या जाणून घ्यायचा. त्यानंतर, ती समस्या सोडवण्याचा दावा करून लोकांकडून पैसे उकळायचा. 

हे ही वाचा: लिव्ह-इन-रिलेशनशिपचा भयानक अंत! पतीला सोडून प्रियकराकडे गेली अन्... अखेर ट्रॉली बॅगेत सापडला मृतदेह

पोलिसांकडून आरोपीला अटक 

मिळालेल्या माहितीनुसार, या मोठ्या फ्रॉड प्रकरणातील आरोपी वासुदेवन आर विरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सखोल तपासानंतर, पोलिसांनी बंगळुरूच्या यशवंतपुर येथे राहणाऱ्या वासुदेवन आर या आरोपीला मंगळवारी अटक केली. त्यानंतर, आरोपीला बुधवारी न्यायालयात सादर करण्यात आलं आणि त्याची तुरुंगात रवानगी करण्यात आली. 

हे ही वाचा: पुणे: 'दैवी शक्ती अन् संपूर्ण संपत्ती विकून त्याग...' मुलींचा आजार दूर करण्याच्या बहाण्याने 14 कोटी रुपयांची फसवणूक!

आरोपी वासुदेवन आर याच्याकडून पोलिसांनी चार मोबाईल फोन आणि 20,300 रुपये रोख रक्कम जप्त केली आहे. जर तुमची सुद्धा अशा पद्धतीने सायबर फसवणूक होत असेल तर राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाइन क्रमांक 1930 वर कॉल करून तुम्ही तक्रार दाखल करू शकता.

हे वाचलं का?

    follow whatsapp