लिव्ह-इन-रिलेशनशिपचा भयानक अंत! पतीला सोडून प्रियकराकडे गेली अन्... अखेर ट्रॉली बॅगेत सापडला मृतदेह

मुंबई तक

पोलिसांना एका खड्ड्यात पडलेल्या ट्रॉली बॅगमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळला. तपासादरम्यान, तो मृतदेह बिहारमधील रहिवासी असलेल्या काजल नावाच्या एका 22 वर्षीय तरुणीचा असल्याचं समोर आलं. नेमकं प्रकरण काय?

ADVERTISEMENT

अखेर ट्रॉली बॅगेत सापडला मृतदेह
अखेर ट्रॉली बॅगेत सापडला मृतदेह
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लिव्ह-इन-रिलेशनशिपचा भयानक अंत!

point

पतीला सोडून प्रियकराकडे गेली अन्...

point

अखेर ट्रॉली बॅगेत सापडला मृतदेह

Crime News: पोलिसांना एका खड्ड्यात पडलेल्या ट्रॉली बॅगमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळला. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित प्रकरण हे गुजरातच्या सूरत येथील असल्याची माहिती आहे. येथील कोसांबा-तर्साडी रोडवरील रेल्वे ओव्हरब्रिजजवळ एका ट्रॉली बॅगमध्ये महिलेचा मृतदेह आढळला. तपासादरम्यान, तो मृतदेह बिहारमधील रहिवासी असलेल्या काजल नावाच्या एका 22 वर्षीय तरुणीचा असल्याचं समोर आलं. 

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता पीडितेचा लिव्ह-इन-पार्टनर रवी शर्माने तिची हत्या केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर, पोलिसांनी आरोपी रवीला फरीदाबाद येथे अटक केली. खरं तर, महिलेच्या हत्येनंतर आरोपी पीडितेच्या दोन वर्षांच्या मुलाला घेऊन फरार झाला. सूरत ग्रामीण लोकल क्राइम ब्रांच (LCB)ने आरोपीला अटक केली असून मुलाला सुरक्षितपणे ताब्यात घेतलं आहे. 

सोशल मीडियावर झाली ओळख...

पोलिसांच्या माहितीनुसार, रवी शर्मा हा मूळचा बिहारच्या मुजफ्फरपुरच्या भटोलिया येथील रहिवासी असून तो दिल्लीतील एका हॉटेलमध्ये काम करत होता. तो सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून महिलांशी मैत्री करायचा. जवळपास एका वर्षापूर्वी त्याची काजल नावाच्या महिलेसोबत ओळख झाली. संबंधित महिला ही मुजफ्फरपुरच्या सरदारपुर गावातील रहिवासी होती. 

हे ही वाचा: पुणे: 'दैवी शक्ती अन् संपूर्ण संपत्ती विकून त्याग...' मुलींचा आजार दूर करण्याच्या बहाण्याने 14 कोटी रुपयांची फसवणूक!

लग्नाच्या कारणावरून सतत वाद...

खरं तर, काजलच्या वैवाहिक आयुष्यात खूप समस्या होत्या. तिचे तिच्या पतीसोबत सतत वाद व्हायचे आणि यामुळे एके दिवशी पतीसोबत भांडून ती दिल्लीला गेली. त्यानंतर, ती बऱ्याचदा रवीला भेटण्यासाठी  हॉटेलमध्ये जायची. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले आणि काजलने त्याच्याकडे लग्नासाठी हट्ट करण्यास सुरूवात केली. पण, या कारणामुळे त्या दोघांमध्ये वाद होऊ लागले. दोन महिन्यांपूर्वी रवी त्याच्या मित्रांच्या मदतीने सूरतमध्ये येऊन तेथे कोसांबा येथे नोकरी करू लागला. दरम्यान, त्याने काजलचा फोन नंबर सुद्धा ब्लॉक केला. त्यानंतर, काजलने रवीच्या मित्रांशी संपर्क साधला आणि रवीबद्दल माहिती न दिल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. याच भितीमुळे रवीच्या मित्रांनी काजलला रवीच्या घराचा पत्ता सांगितला. 

हे वाचलं का?

    follow whatsapp