पुणे: 'दैवी शक्ती अन् संपूर्ण संपत्ती विकून त्याग...' मुलींचा आजार दूर करण्याच्या बहाण्याने 14 कोटी रुपयांची फसवणूक!
पुण्यात अंधश्रद्धेच्या माध्यमातून विश्वास संपादन करून एका कुटुंबियांची 14 कोटी रुपयांची फसवणूक केल्याची बातमी समोर आली आहे. बऱ्याच उपचारांनंतर सुद्धा मुलींच्या प्रकृतीत काहीच सुधार होत नसल्याने पीडित कुटुंबियांनी वेगळाच मार्ग अवलंबला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुलींचा आजार दूर करण्याच्या बहाण्याने 14 कोटी रुपयांची फसवणूक!
'दैवी शक्ती अन् संपूर्ण संपत्ती विकून त्याग...'
पुण्यातील कुटुंबियांसोबत नेमकं काय घडलं?
Pune Crime: पुण्यात अंधश्रद्धेच्या माध्यमातून विश्वास संपादन करून एका कुटुंबियांची 14 कोटी रुपयांची फसवणूक केल्याची बातमी समोर आली आहे. प्रकरणातील पीडित पती आणि पत्नी हे पुण्यातील एका खाजगी कंपनीत कार्यरत होते. त्यांना दोन मुली असून त्या सतत आजारी असायच्या. एका मुलीला एलोपेशिया (केसगळती) आणि दुसरी मुलगी सुद्धा अशाच गंभीर आजाराने ग्रस्त होती. या आजारावर डॉक्टरांकडून बरेच उपचार करण्यात आले पण, तरीसुद्धा दोघींच्या प्रकृतीत काहीच सुधार होत नव्हता. यामुळेच, पीडित कुटुंबियांनी वेगळाच मार्ग अवलंबला.
संपूर्ण त्याग आणि दान करण्याची गरज...
मिळालेल्या माहितीनुसार, एके दिवशी शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीकडून संबंधित दाम्पत्याची वेदिका कुणाल पंढरपुरकर नावाच्या महिलेशी ओळख झाली. खरं तर, वेदिका एका सामान्य महिला नसून तिच्या शरीरात सतत पुण्यात्माचा प्रवेश होत असल्याचं तिने पीडितांना सांगितलं. त्यावेळी, ती पीडित जोडप्याला शांतपणे म्हणाली की, "बाबा स्वत:च्या तुमच्या मुलींना ठिक करण्यासाठी आले आहेत. मात्र, यासाठी संपूर्ण त्याग आणि दान करण्याची गरज आहे."
संबंधित दाम्पत्याला केवळ आपल्या मुलींचा आनंद हवा होता. त्यावेळी, त्यांना वेदिकाच्या रूपात आपल्या मुली पूर्णपणे बऱ्या होणार असल्याचा आशेचा किरण दिसला. वेदिका डोळे बंद करून बदललेल्या आवाजात दाम्प्त्याला म्हणाली की, "मुलींची आजारातून लवकरच सुटका होईल, पण तुम्हाला नारळ, सुपारी, काळे दगड ठेवून महादान करावं लागणार."
हे ही वाचा: पत्नी दुसऱ्या पुरुषासोबत बोलत असल्याचा राग! संतापलेल्या पतीने पत्नीचं नाकच कापून टाकलं अन् रुग्णालयात नेल्यानंतर...
शेत, जमिनीसह प्रॉपर्टी विकण्यास सांगितलं
कालांतराने वेदिकाचा पती कुणाल आणि त्याचा साथीदार दीपक खडसे याने पीडित जोडप्याचा विश्वास संपादन करून आपल्या जाळ्यात अडकवलं आणि त्यांना त्यांच्या आयुष्याची सगळी कमाई दान करण्यास सांगितली. पीडित जोडप्याने सुद्धा आरोपींच्या बोलण्याला बळी पडून आधी त्यांचं लहान घर विकलं, त्यानंतर शेत, जमीन आणि परदेशातील त्यांची प्रॉपर्टी सुद्धा विकली. इतकेच नव्हे तर, मुलींच्या प्रकृतीत सुधारणा आणण्यासाठी त्यांनी त्यांचं सोनं गहाण ठेवलं, बँकेकडून कर्ज घेतलं आणि बँक खात्यातून त्यांनी करोडो रुपये ट्रान्सफर केले.










