Mumbai News: मुंबईला एक इंटरनॅशनल शहर म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने मुंबई हायकोर्टाने मोठा निर्णय घेतल्याचं समोर आलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, जर मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर म्हणून विकसित करायचे असेल, तर सरकार आणि त्याच्या संस्थांना 2011 सालानंतर बांधलेल्या बेकायदेशीर झोपडपट्ट्यांवर कठोर कारवाई करावी लागेल. मुंबईत झोपडपट्ट्यांचा बेकायदेशीरपणे झालेला विस्तार हा शहराच्या विकासात मोठा अडथळा ठरत आहे आणि त्यामुळे सरकारने प्रगतीशील विचारसरणीने या दृष्टीने कठोर पाऊल उचलणं गरजेचं असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
न्यायालयाचे तोंडी निरीक्षण...
सुनावणीदरम्यान, न्यायालयाने तोंडी निरीक्षण दिलं की "मुंबईतील झोपडपट्ट्या इतक्या एकमेकांशी जोडल्या गेल्या आहेत की एखादा परिसर पूर्णपणे झोपडपट्ट्यांनी कधी भरतो हे सांगणे कठीण आहे."
हे ही वाचा: Govt Job: भारतातील सर्वात मोठ्या स्टील कंपनीत इंजिनीअर उमेदवारांसाठी भरती! पगार तर लाखोंच्या घरात...
मानखुर्द परिसराचे उदाहरण देत न्यायालयाने विचारले की 'झोपडपट्ट्यांना संरक्षण देण्यासाठी निश्चित केलेल्या अंतिम मुदतीनंतर (2011) शहरात झालेल्या बेकायदेशीर बांधकामांवर सरकारने आतापर्यंत काय कारवाई केली आहे.' सरकारच्या वतीने कोर्टात उपस्थित असलेल्या वकिलांनी सांगितलं की, 2011 नंतर बांधण्यात आलेल्या झोपड्यांना कोणत्याही प्रकारचं संरक्षण देण्यात आलेलं नाही. यावर, जर सरकारला खरंच मुंबईला जागतिक दर्जाचे शहर म्हणून विकसित करायचं असेल, तर शहरातील झोपडपट्टी विस्तारावर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस पावले उचलावी लागणार असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.
हे ही वाचा: छत्रपती संभाजीनगर: विवाहित मुलगी प्रियकरासोबत गेली पळून! सहन न झाल्याने आईने उचललं टोकाचं पाऊल, पोलिसांवर गंभीर आरोप...
बेकायदेशीर झोपडपट्ट्यांवर कठोर कारवाई आवश्यक
हे प्रकरण महाराष्ट्र झोपडपट्टी कायदा, 1971 च्या पुनरावलोकनाशी संबंधित आहे. 30 जुलै 2024 रोजी, सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाला स्वतःहून या कायद्याचा आढावा घेण्याचे निर्देश दिले होते. याचं मुख्य कारण म्हणजे मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प वर्षानुवर्षे रखडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, झोपडपट्टी कायद्याअंतर्गत 1,600 हून अधिक प्रकरणे सध्या उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. अशातच, आता शहरातील बेकायदेशीर झोपडपट्ट्यांवर कठोर कारवाई करणे हे शहराच्या संतुलित विकासाच्या आणि नागरी सुविधांच्या विस्ताराच्या दिशेने पहिले पाऊल असू शकतं, असं न्यायालयाने सांगितलं आहे.
ADVERTISEMENT











