Govt Job: भारतातील सर्वात मोठ्या स्टील कंपनीत इंजिनीअर उमेदवारांसाठी भरती! पगार तर लाखोंच्या घरात...
भारत सरकारच्या 'स्टील ऑथरिटी ऑफ इंडिया लिमिटेड' कंपनीकडून मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
भारतातील सर्वात मोठ्या स्टील कंपनीत इंजिनीअर उमेदवारांसाठी भरती!
पगार तर लाखोंच्या घरात...
कधीपासून अर्ज करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात?
Govt Job: इंजिनीअरिंगचं शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी भारत सरकारच्या सर्वात मोठ्या कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. भारत सरकारच्या 'स्टील ऑथरिटी ऑफ इंडिया लिमिटेड' कंपनीकडून मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज करण्याची प्रक्रिया 15 नोव्हेंबर रोजी सुरू होणार असून उमेदवार sailcareers.com या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात.
सेल मॅनेजमेंट ट्रेनीची ही भरती टेक्निकल फिल्डसाठी असून यामध्ये केमिकल, सिव्हिल, कंप्यूटर, इलेक्ट्रिकल अशा संबंधित विषयातून इंजिनीअरिंगचं शिक्षण घेतलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. 5 डिसेंबर 2025 पर्यंत उमेदवारांना अर्ज करण्यासाठी अॅप्लिकेशन विंडो सुरू राहील.
काय आहे पात्रता?
या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 65 टक्के गुणांसह केमिकल, सिव्हिल, कंप्यूटर, इलेक्ट्रिकल, इंस्ट्रमेंटेशन, मॅकेनिकल आणि मेटलर्जि अशा फूल टाइम कोर्समधून इंजिनीअरिंगची डिग्री असणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त, भरतीसाठी कोणत्याही प्रकारचा कार्याचा अनुभव ग्राह्य धरला जाणार नसून नुकतंच इंजीनिअरिंग उत्तीर्ण झालेले फ्रेशर्स उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.
हे ही वाचा: छत्रपती संभाजीनगर: विवाहित मुलगी प्रियकरासोबत गेली पळून! सहन न झाल्याने आईने उचललं टोकाचं पाऊल, पोलिसांवर गंभीर आरोप...
वयोमर्यादा
या भरतीसाठी 24 वर्षे कमाल वयोमर्यादा निश्चित केली असून 5 डिसेंबर 2025 या तारखेच्या आधारे उमेदवारांच्या वयाची गणना केली जाईल. तसेच, सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात येणार आहे.










