छत्रपती संभाजीनगर: विवाहित मुलगी प्रियकरासोबत गेली पळून! सहन न झाल्याने आईने उचललं टोकाचं पाऊल, पोलिसांवर गंभीर आरोप...

मुंबई तक

छत्रपती संभाजीनगरमध्ये आपली विवाहित मुलगी तिच्या प्रियकरासोबत पळून गेल्यानंतर, महिलेने घरातच गळफास घेत आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे.

ADVERTISEMENT

आईने उचललं टोकाचं पाऊल, पोलिसांवर गंभीर आरोप...
आईने उचललं टोकाचं पाऊल, पोलिसांवर गंभीर आरोप...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

विवाहित मुलगी प्रियकरासोबत गेली पळून!

point

सहन न झाल्याने आईने उचललं टोकाचं पाऊल

point

मृत महिलेच्या नातेवाईकांनी पोलिसांवर गंभीर आरोप...

Chhatrapati Sambhajinagar Crime: छत्रपती संभाजीनगरमध्ये अनैतिक प्रेमसंबंधातून धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. आपली विवाहित मुलगी तिच्या प्रियकरासोबत पळून गेल्यानंतर, महिलेने घरातच गळफास घेत आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. संबंधित प्रकरणातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील उस्मानपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. मुलगी बेपत्ता असल्याची पोलिसात तक्रार करण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी यासाठी सहकार्य न करता कारवाईसाठी 50 हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. नेमकं प्रकरण काय? सविस्तर जाणून घ्या. 

कारवाईसाठी पोलिसांची 50 हजार रुपयांची मागणी

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या 21 वर्षीय मुलीचा विवाह झाला असून लग्नानंतर सुद्धा तिचे दुसऱ्याच तरुणासोबत विवाहबाह्य संबंध होते. 8 नोव्हेंबर रोजी संबंधित तरुणी ही तिच्या प्रियकरासोबत घर सोडून पळून गेली. त्यानंतर, महिलेने थेट पोलिसात धाव घेऊन मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी यासाठी सहकार्य न करता कारवाईसाठी 50 हजार रुपयांची मागणी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. 

हे ही वाचा: सहामाही परीक्षेत कमी गुण मिळाले... कल्याणच्या रौनक सिटीत 19 व्या मजल्यावरून उडी घेऊन 8 वीत शिकणाऱ्या पीडितेची आत्महत्या!

साडीने गळफास घेत आईची आत्महत्या 

प्रकरणातील 50 वर्षीय मृत महिलेचं नाव रेखा राजू जाधव असल्याची माहिती समोर आली आहे. आठ दिवसांपूर्वीच, पीडित महिलेची मुलगी सासरी काहीच न सांगता तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. पोलिसांकडून सुद्धा सहकार्य न मिळाल्याने रेखा नैराश्यात गेल्या. आपल्या मुलीच्या कृत्यामुळे नैराश्यात गेलेल्या रेखा यांनी त्यांच्या राहत्या घरी साडीच्या मदतीने गळफास घेत आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत माहिती मिळताच, कुटुंबियांनी रेखा यांना तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात नेलं मात्र, त्यावेळी, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. 

हे ही वाचा: Bihar Election Result 2025 Live Update: बिहारमध्ये NDA ची त्सुनामी, महाराष्ट्रासारखा निवडणूक निकाल!

कुटुंबियांचे पोलिसांवर गंभीर आरोप 

रेखा यांच्या मृत्यूमुळे कुटुंबियांना आणि शेजाऱ्यांना मोठा धक्का बसला. घटनेने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी महिलेचा मृतदेह पोलीस स्टेशनमध्ये आणून पोलिसांवर गंभीर आरोप केले. कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी या प्रकरणाकडे लक्ष न दिल्याने आणि तक्रार नोंदवायला गेल्यानंतर पैशांची मागणी केल्यामुळे रेखा यांचा मृत्यू झाला. आता, या प्रकरणासंदर्भात पूजाच्या भावाने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस दलाने ठाण्याबाहेर कडेकोट बंदोबस्त तैनात केला. तसेच, पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन मृत महिलेच्या नातेवाइकांशी चर्चा केली असल्याचं सांगितलं जात आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp