Mumbai News: येणाऱ्या काळात मुंबईच्या पायाभूत सुविधांमध्ये पूर्णपणे बदल पाहायला मिळेल, कारण आर्थिक राजधानीला पहिला रेल्वे डबल-डेकर ब्रिज मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. खरंतर, 112 वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल आता एमएमआरडीएने अधिकृतपणे बंद केला आहे आणि त्याची जबाबदारी MRIDC कडे सोपवण्यात आली आहे. हा पूल पाडला जाईल आणि नंतर डिझायनिंगनुसार बांधला जाईल. भविष्यात निर्माण होणारा हा पूल मध्य मुंबईत उत्तम कनेक्टिव्हिटी प्रदान करेल.
ADVERTISEMENT
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) या पुलाच्या बांधकामाची माहिती MRIDC सोपवली आहे. विशेष म्हणजे हा पूल डबल डेकर म्हणजेच दुमजली असणार आहे, ज्यामुळे गर्दी कमी होईल आणि वाहनांची सुरळीतता सुनिश्चित होईल.
एका वर्षात काम पूर्ण करण्याचं लक्ष्य
या प्रोजेक्टचा खर्च अंदाजे 167.35 कोटी रुपये असेल. सर्व आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतर, तो सुमारे एका वर्षात पूर्ण करण्याचं लक्ष्य आहे. या प्रकल्पातील सर्वात मोठं आव्हान म्हणजे जुने ROB काढून टाकणे. यासाठी 800 मेट्रिक टन क्षमतेच्या दोन क्रेन बसवल्या जातील. विशेष म्हणजे हे काम पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या रेल्वे ऑपरेशन दरम्यान केले जाईल, ज्यासाठी काटेकोर नियोजन आणि सुरक्षा व्यवस्था केली जाईल.
हे ही वाचा: “घरजावई हो नाहीतर...” होणाऱ्या जावयाने दिला नकार अन् सासरच्या मंडळींनी थेट...
चांगली कनेक्टिव्हिटी निर्माण होईल
हा रोड ओव्हर ब्रिज पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या रुळांवरून जाईल, ज्याची एकूण रेल्वे लांबी 132 मीटर असेल. या पुलावर 2+2 लेन असतील आणि खालच्या डेकवर चालण्यासाठी एक फुटपाथ असेल, जो पूर्व आणि पश्चिम रेल्वेला जोडेल. हे थेट शिवडी वरळी अलिव्हेटेड कॉरिडॉरशी जोडले जाईल आणि अटल सेतू (मुंबई ट्रान्स हार्बर लिंक) ला कनेक्टिव्हिटी देईल. ROB चं सुपर स्ट्रक्चर ओपन वेब गर्डर टेक्नॉलॉजीवर आधारित असेल, जी रेल्वे पूल बांधणीत अत्यंत टिकाऊ आणि मजबूत मानली जाते.
पूल बंद झाल्यानंतर बसचा मार्ग...
एल्फिन्स्टन पूल बंद झाल्यानंतर, अनेक बेस्ट बसेसचे मार्ग बदलण्यात आले आहेत. महादेव पालव रोड (करी रोड ब्रिज) ते शिंगाटे मास्टर चौक ते भारत माता पर्यंत जाणाऱ्या अप आणि डाउन बसेस आता चिंचपोकळी पुलावरून वळवण्यात आल्या आहेत. या लिस्टमध्ये बस रूट क्रमांक 14, 57, 44, 52, 50, 162, 168 समाविष्ट आहेत. हा बदल शनिवारी दुपारी 03:30 वाजल्यापासून लागू करण्यात आला आहे.
हे ही वाचा: पत्नी आणि मुलासमोर थेट मुंडकच कापलं अन् डस्टबिनमध्ये... अमेरिकेत ‘त्या’ भारतीयासोबत काय घडलं?
वाहतूक पोलिसांनी एक सूचना जाहीर केली आहे. मुंबई पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारी वाहने दादर पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि दादर मार्केटकडे जाण्यासाठी टिळक ब्रिजमार्गे जातील. परळहून प्रभादेवी आणि लोअर परळकडे जाणाऱ्या वाहनांसाठी डायव्हर्जन देखील लागू करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
