Crime News: उत्तर प्रदेशातील अमरोहामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे 10 महिन्यांपूर्वीच एका 21 वर्षीय तरुणीचं निगम नावाच्या तरुणासोबत लग्न झालं होतं. एके दिवशी, रात्री संबंधित महिलेला तिच्या पतीने चिकन बनवायला सांगितलं. पत्नी शाकाहारी असल्यामुळे यासाठी नकार दिला पण तरीही पती त्याच्या हट्ट सोडत नव्हता. पत्नीला इतका राग आला की तिनं यामुळे भयानक पाऊल उचललं. नेमकं प्रकरण काय?
ADVERTISEMENT
चिकन बनवण्याच्या कारणावरून वाद...
दहा महिन्यांपूर्वी रीना नावाच्या तरुणीचं निगमसोबत लग्न झालं होतं. लग्नानंतर, सुरूवातीला सगळं ठिक चाललं होतं. मात्र, 20 ऑगस्ट 2025 च्या रात्री एका किरकोळ कारणावरून दोघांमध्ये मोठा वाद झाला. खरंतर, त्या रात्री निगमला चिकन खाण्याची इच्छा झाली होती आणि म्हणून त्याने आपल्या पत्नीला घरी चिकन बनवायला सांगितलं. रीनाला हे अजिबात पटलं नाही. तिने यासाठी आपल्या पतीला स्पष्टपणे नकार दिला. पण, निगम त्याच्या हट्ट सोडायला तयारच नव्हता. यावरून दोघांमध्ये मोठा वाद झाला. निगमने याचा आग्रह धरत नंतर त्यानेच चिकन शिजवलं. रीनाला याचं इतकं वाईट वाटलं की तिने रागाच्या भरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
हे ही वाचा: वडिलांनी केलं दोन महिलांसोबत लग्न अन् नंतर पहिल्या मुलीसोबत केलं घृणास्पद कृत्य! 6 दिवसांपर्यंत...
मृतदेह कापडात गुंडाळून नदीत फेकला
या घटनेनंतर जे घडलं ते आणखी भयानक होतं. पोलिसांपासून वाचण्यासाठी निगम आणि त्याच्या कुटुंबियांनी रीनाचा मृतदेह कापडात गुंडाळला आणि गावासमोरून वाहणाऱ्या नदीत तो फेकून दिला. त्यानंतर, कोणालाही संशय येऊ नये म्हणून निगमने पोलिसात आपली पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पण रीनाच्या घरच्यांना याबद्दल संशय आला. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी निगमची कठोर चौकशी केली. शेवटी निगमने सत्य घटना उघडकीस आणली.
हे ही वाचा: OYO हॉटेल आणि वासनेचा खेळ, पती-पत्नीने अवघ्या नागपूरला केलं हैराण, कांड समजला तर तुम्हीही...
पोलिसांचा तपास
पोलिसांनी या प्रकरणासंदर्भात तातडीने कारवाई सुरू केली. त्यावेळी, पीडितेच्या सासरच्या लोकांविरुद्ध हुंड्यामुळे हत्या केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणातील तीन आरोपींना अटक केली असून नदीमध्ये रीनाच्या मृतदेहाचा शोध घेतला जात आहे.
ADVERTISEMENT
