Maharashtra Weather: कोकणात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, कसं असेल वातावरण?

Maharashtra Weather Today: भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यासाठी 13 सप्टेंबर 2025 रोजी हवामानाचा अंदाज जारी केला आहे.

maharashtra weather (grok)

maharashtra weather

मुंबई तक

• 05:44 AM • 13 Sep 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

भारतीय हवामान विभागाचा अंदाज

point

13 सप्टेंबर 2025 रोजी हवामानाचा कसा असेल अंदाज?

हे वाचलं का?

Maharashtra Weather : भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यासाठी 13 सप्टेंबर 2025 रोजी हवामानाचा अंदाज जारी केला आहे. राज्यात बहुतांश भागात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. तर काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची हवामान विभागाने शक्यता वर्तवली आहे. मराठवाडा आणि कोकण भागात वेगवान वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची तीव्रता अधिक असण्याची अपेक्षा वर्तवली आहे.

कोकण विभाग:

कोकण भागातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर बहुतेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस आणि वीज कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. कोकणातील रायगडमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याच भागात वाऱ्याचा वेग 30-40 किमी प्रतितास असण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा : मूल होत नाही म्हणून महिला मांत्रिकाकडे गेली, नंतर पेढा देत अंगारही लावला, तीन लाखांना गंडा घालत... नऊ महिने सुरू होता खेळ

मध्य महाराष्ट्र:

मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस वीज आणि वेगवान वाऱ्यांसह असण्याची शक्यता आहे. तसेच सोलापूरातही हवामान विभागाने मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच पुणे शहरात वीज कडकडाटासह वादळी वाऱ्याचा वेग हा 30-40 किमी प्रतितास अपेक्षित असणार आहे.

मराठवाडा:

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच नांदेड आणि लातूरमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता, तर परभणी आणि हिंगोलीत मुसळधार पावसासह वीज आणि वेगवान वारे वाहण्याची हवामान विभागाची शक्यता आहे.

हे ही वाचा : युपीएससीच्या विद्यार्थ्याने 'त्या' एका कारणाने गुप्तांगच छाटलं, वयाच्या 14 व्या वर्षांपासूनच जाणवू लागला बदल नंतर...

विदर्भ:

विदर्भातील नागपूरसह बहुतेक जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. तर याच भागातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. नागपूर शहरात विजांच्या गडगडाटासह वादळासह पावसाची शक्यता आहे.

    follow whatsapp