pooja gaikwad : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात लुखामसलाचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सासुरे गावात जाऊन स्वत:वर गोळीबार करत आत्महत्या केली. या घटनेनं महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. कलाकेंद्रातील नर्तकी पूजा गायकवाड हिच्यावरील प्रेमातून आलेल्या नैराश्यातून आत्महत्या केली. अशातच पोलिसांनी पूजा गायकवाडला मुख्य आरोपी म्हणून ताब्यात घेतलं आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : 'माझी भावकीत अब्रू जाईल...' माजी उपसरपंचाने पूजा गायकवाडला सांगितली 'ती' गोष्टी पण तरीही पूजाने...
पूजा गायकवाडचे इंस्टाग्रामवर किती फॉलोअर्स
दरम्यान, पूजा गायकवाडचे काही दिवसांपूर्वी 500 ते 700 फॉलोअर्स होती. मात्र, या प्रकरणानंतर गोविंद बर्गेंनी आत्महत्या केल्यानंतर दोनच दिवसांमध्ये पूजाच्या फॉलोअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. आता फॉलोअर्सचा आकडा तब्बल 18 हजारांपार गेला आहे. 12 सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजेपर्यंत हा आकडा 22 हजार 700 आकड्याच्या पलिकडे गेलेत. दररोज दिवसभरात फॉलोअर्स हजारोंच्या संख्येनं वाढ होऊ लागली आहे. त्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड होताना दिसतात.
पूजा गायकवाड हिचे नृत्य करतानाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होऊ लागले आहेत. याच व्हिडिओमुळे तिच्या फॉलोअर्समध्ये आणखी वाढ होऊ लागली आहे. तिने 500 रुपयांच्या नोटांसह रिल्स बनवल्या आहेत.
हे ही वाचा : Pooja Gaikwad: 'तेरे जैसे चार है मेरे पास...', उपसरपंचाने गोळी झाडून घेतल्यानंतर पूजा गायकवाडचा 'हा' Video होतोय Viral
सोनं, नाणं सर्व उकळलं अन् शेवटी....
दरम्यान, गोविंद गर्बे यांनी नर्तकी पूजा गायकवाडवर पैसे, जमीन, जुमला, सोनं, नाणं सर्व काही उधळलं आणि जेव्हा तिनं घराचा विषय काढला तेव्हा गोंविदला आश्चर्याचा धक्काच बसला होता. त्याने राहते घर देण्यास नकार दिला. त्यानंतर पूजाने गोविंद बर्गेशी बोलणं बंद केलं. पूजा आपल्याशी अशी का वागत असेल? असा गोविंद बर्गे यांना प्रश्न उपस्थित झाला. अखेर गोविं बर्गेनं सोलापूरातील बार्शीतील वैराग येथे जाऊन त्याने डोक्यावर गोळी झाडून आत्महत्या केली.
ADVERTISEMENT
