गोविंद बर्गे आत्महत्येप्रकरणी मोठा ट्विस्ट, उपसरपंचाशी प्रेमसंबंध असल्याचा पूजाचा कबुलीनामा, नेमकं पुढं काय घडलं?

Pooja Gaikwad case twist : गोविंद बर्गे या उपसरपंचाने केलेल्या आत्महत्येच्या घडामोडीला एक वेगळं वळण प्राप्त झालं आहे. सुरुवातीला बर्गेच्या कुटुंबीयांनी नर्तकी पूजा गायकवाडवर गंभीर आरोप करत आत्महत्येत प्रवृत्त करत गुन्हा दाखल केला आहे.

govind barge and pooja gaikwad case

govind barge and pooja gaikwad case

मुंबई तक

12 Sep 2025 (अपडेटेड: 12 Sep 2025, 01:08 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

उपसरपंचाने केलेल्या आत्महत्येच्या घडामोडीला वेगळं वळण

point

नर्तकी पूजा गायकवाडवर गंभीर आरोप

point

शांतचे आणि पूजाचे प्रेमसंबंथ असल्याचा कबुलीनामा

Pooja Gaikwad case twist : गोविंद बर्गे या उपसरपंचाने केलेल्या आत्महत्येच्या घडामोडीला एक वेगळं वळण प्राप्त झालं आहे. सुरुवातीला बर्गेच्या कुटुंबीयांनी नर्तकी पूजा गायकवाडवर गंभीर आरोप करत आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणात आता पूजाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात न्यायालयाने तीन दिवसांची कोठडी दिली आहे. मात्र, चौकशीत पूजाने गोविंद बर्गेसोबत प्रेमसंबंध असल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणाला आता नवे वळण प्राप्त झाले आहे. पूजाचा भाऊ प्रशांतचे आणि पूजाचे प्रेमसंबंथ असल्याचे सांगितल्याची महत्त्वाची अपडेट आता समोर आली आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : पूजा गायकवाड नर्तिका तुरुंगात, तरीही फॉलोअर्समध्ये झाली तब्बल 'एवढी' वाढ, लाईक्सचा पडतोय पाऊस

पूजा गायकवाड प्रकरणात मोठा ट्विस्ट

गोविंद बर्गे यांनी सोमवारी बार्शी गाठून पूजा गायकवाडच्या घरासमोर जाऊन स्वत:वर गोळीबार करत आत्महत्या केली. त्यावेळी पूजा गायकवाड ही बार्शीतील कला केंद्रात रात्रभर होती, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. उपसरपंच गोविंद यांनी पूजाला अनेकदा फोनद्वारे संपर्क केले, मात्र तिने फोन उचलला नाही. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सकाळी गाडीचा दरवाजा लॉक केलेल्या अवस्थेत असताना त्यांचा मृतदेह मिळाला.

जमीन जुमला, सोनं, नाणं, महागडे मोबाईल सारंच लुटलं...

दीड वर्षांपूर्वी कला केंद्रात झालेल्या ओळखीपासूनच गोविंद आणि पूजामध्ये प्रेमसंबंध होते. त्यानंतर पूजाने गोविंदकडून अनेक महागड्या वस्तू घेतल्या. जमीन जुमला, सोनं, नाणं, महागडे मोबाईल अशा काही वस्तू दिल्या होत्या. पूजा एवढ्यावरच न थांबता तिने गोविंदला गेवराईतील बंगला तिच्या नावावर करण्याचा आणि आपल्या भावाच्या नावावर पाच एकर शेती करण्याचा हट्ट धरला. मागणी मान्य न केल्यास धमकी दिली तसेच ब्लॅकमेल करण्याचा आरोप आहे. 

हे ही वाचा : 'माझी भावकीत अब्रू जाईल...' माजी उपसरपंचाने पूजा गायकवाडला सांगितली 'ती' गोष्टी पण तरीही पूजाने...

सध्या पूजाला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून कॉल्स डिटेल्स व इतर पुराव्यांच्या आधारे तपास सुरु केला. गोविंद वर्गे यांनी केलेल्या आत्महत्येचं खरं कारण समोर आलं आहे दोघांमधील होणारा वादाचं ठोस कारण नेमकं काय होतं, याचा पोलीस शोध घेत आहेत.

    follow whatsapp