माजी उपसरपंचाने पूजाला दाखवला बंगला अन् सगळा खेळ खल्लास! पूजाचा होता 'त्या' बंगल्यावर डोळा, तिच्या नादापायी...

माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून घेत आपलं आयुष्य संपवलं. पण आता या प्रकरणी नर्तिका पूजा गायकवाड हिच्यावर वेगवेगळे आरोप केले जात आहेत.

did pooja gaikwad want govind barge new bungalow for what exact reason did the former deputy sarpanch end his own life

माजी उपसरपंचाने पूजाच्या नादापायी स्वत: संपवलं?

मुंबई तक

• 10:44 PM • 11 Sep 2025

follow google news

योगेश काशीद, बीड: बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे (वय 38) यांनी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सासुरे गावात एका नर्तकीच्या घरासमोर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (9 सप्टेंबर) सकाळी उघडकीस आली, ज्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. गोविंद यांच्या निधनानंतर नातेवाईक आणि गावकऱ्यांनी हत्या असल्याचा संशय व्यक्त केला होता. तर पोलीस तपासात आत्महत्येची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, या प्रकरणाला नर्तकी पूजा गायकवाड हिच्याशी जोडले जाणारे प्रेमसंबंध आणि बंगल्याची मागणी हे आत्महत्येमागचं  कारण आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

हे वाचलं का?

घटनेची पार्श्वभूमी: प्रेमसंबंध आणि फसवणुकीचे आरोप

गोविंद बर्गे हे लुखामसला गावचे माजी उपसरपंच असून, ते विवाहित आणि दोन मुलांचे वडील होते. ते व्यवसायाने शेतकरी आणि स्थानिक राजकारणी म्हणून ओळखले जात होते. गेल्या दीड वर्षांपासून त्यांचा सोलापूरमधील बार्शी तालुक्यातील सासुरे गावातील कला केंद्रातील नर्तकी पूजा गायकवाड (वय 21) यांच्याशी प्रेमसंबंध होते. या संबंधात गोविंद यांनी पूजाला सोन्याचे दागिने, लाखो रुपयांचा मोबाइल फोन आणि इतर महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. मात्र, काही दिवसांपूर्वी पूजाने गोविंद यांच्याशी संपर्क तोडला होता. तसंच तिने गेवराई येथील त्यांच्या आलिशान बंगला नावावर करण्याची मागणी केली होती, असा आरोप गोविंद यांच्या कुटुंबाने केला आहे.

हे ही वाचा>> बाईचा नाद लय बेकार! नर्तिकेच्या नादी लागला उपसरपंच, जमीन जुमला अन् सोनं नाणं सारंच लुटलं, अखेर स्वत:च्याच डोक्यावर बंदुक...

गोविंद यांचे भावाने या प्रकरणी वैराग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पूजाने गोविंद यांना "तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन" अशी धमकी दिली होती. तसेच, तिने "मला तुझ्याशी ब्रेकअप करायचं, माझ्याकडे तुझ्यासारखे चार आहेत" असा रील इन्स्टाग्रामवर शेअर केला होता, जो आता व्हायरल होत आहे. 

दुसरीकडे 9 सप्टेंबरच्या मध्यरात्री ते पूजाच्या घरासमोर पोहोचले आणि कारमध्ये बसून ड्रायव्हर सीटवर स्वतःच्या पिस्तुलातून डोक्यात गोळी झाडून घेतली.

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कारचा तपास केला असता, कार आतून लॉक असल्याचे आणि बॅटरी डाऊन झाल्याचे आढळले. गोविंद यांच्या उजव्या कपाळावर गोळी लागली होती आणि ते रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत सापडले. पोलिसांनी पिस्तूल जप्त केले असून, प्राथमिक तपासात आत्महत्या असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, नातेवाईकांनी "गोविंद यांच्याकडे पिस्तूल नव्हते, ही हत्या आहे" असा आरोप केला आहे. त्यांच्या मते, मागील सहा महिन्यांपासून त्यांना मानसिक त्रास होत होता आणि पूजाने मालमत्ता मिळवण्यासाठी फसवणूक केली होती.

हे ही वाचा>> दुसऱ्याच पुरुषासोबत होते अनैतिक संबंध! पतीला पत्नीच्या अफेअरची लागली भनक अन् घडलं असं की...

गेवराईतील बंगला: मृत्यूचे मुख्य कारण?

या प्रकरणातील सर्वात चर्चेचा मुद्दा म्हणजे गेवराईतील आलिशान बंगला. गोविंद यांनी हा बंगला एक वर्षांपूर्वी खरेदी केला होता आणि तो माधवनगर भागात आहे. गेल्या 10 ते 15 दिवसांपूर्वी या बंगल्याची वास्तुशांती झाली होती. गोविंद यांच्या मेव्हण्याने दिलेल्या माहितीनुसार, या बंगल्यात लवकरच कुटुंबासह राहायला येणार होते. त्याआधी गोविंद यांनी पूजाला हा बंगला दाखवला होता. त्यावेळी तिने दोन दिवस त्या बंगल्यात मुक्कामही केला होता. त्यानंतर तिने हा बंगला माझ्या नावावर करा असा तगादा लावला होता. तेव्हा गोविंद यांनी तिला दुसरे घर घेऊन देतो, परंतु हा बंगला मी तुझ्या नावावर करू शकत नाही. असं म्हणत तिला या बंगल्यासाठी नकार दिला होता. पण पुजाने हाच बंगला नावावर करण्याची सातत्याने मागणी केली होती आणि पण गोविंद यांनी नकार दिल्याने तिने संपर्क तोडला होता. असा आरोप गोविंद यांच्या मेव्हण्याने केला आहे.

 

घटनेची टाइमलाइन

घटना

1 वर्षांपूर्वी

गेवराईतील बंगला खरेदी.
गेल्या 10-15 दिवसांपूर्वी

बंगल्याची वास्तुशांती

8 सप्टेंबर 2025

गोविंद यांनी पूजाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न; नकार मिळाला.

9 सप्टेंबर मध्यरात्री

पूजाच्या घरासमोर कारमध्ये आत्महत्या.

10 सप्टेंबर

पोलीस तपास; पूजा गायकवाडवर गुन्हा दाखल आणि अटक

पोलीस कारवाई आणि सोशल मीडियावरील प्रतिक्रिया

वैराग पोलिसांनी पूजा गायकवाडवर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा (IPC कलम 106) गुन्हा दाखल केला आहे. तिला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली गेली असून, पोस्टमॉर्टम अहवालाची वाट पाहिली जात आहे. दुसरीकडे या सगळ्या प्रकरणावरून सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. 

लुखामसला गावात गोविंद यांच्या मृत्यूने शोककळा पसरली आहे. गावकऱ्यांनी म्हटले, "गोविंद हे सामाजिक कार्यकर्ते होते, उपसरपंच म्हणून गाव विकासात योगदान दिले. असा शेवट अपेक्षित नव्हता. पोलिसांनी तपास अजून सुरू असल्याने, हत्या की आत्महत्या याचे उत्तर लवकरच मिळेल.

    follow whatsapp