बीड: बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे (वय 38) यांनी सोमवारी मध्यरात्री आपल्या कारमध्ये स्वत:वर गोळी झाडून घेतली. या प्रकरणात नर्तिका पूजा गायकवाड हिच्याशी असलेल्या प्रेमसंबंधामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त होत आहे. या घटनेनंतर पूजाचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
ADVERTISEMENT
व्हायरल व्हिडिओत, एका पुरुषाच्या आवाजात “मेरे पास बंगला है, गाडी है, पैसा है… तेरे पास क्या है?” असा प्रश्न विचारला जातो. त्यावर पूजा लिप-सिंक करत प्रत्युत्तर देते, “तेरे जैसे चार है.” हा व्हिडिओ ब्रेकअपच्या संदर्भात असल्याचे मानले जात आहे. गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येनंतर हा व्हिडिओ अधिक गंभीर नजरेने पाहिला जात असून, सोशल मीडियावर याबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. अनेकांनी या व्हिडिओला पूजाच्या बेपर्वा वृत्तीचे प्रतीक मानले आहे.
हे ही वाचा>> माजी उपसरपंचाने पूजाला दाखवला बंगला अन् सगळा खेळ खल्लास! पूजाचा होता 'त्या' बंगल्यावर डोळा, तिच्या नादापायी...
प्रेमसंबंध आणि आत्महत्येचा संशय
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, गोविंद बर्गे आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सासुरे गावातील 21 वर्षीय पूजा गायकवाड यांच्यात दीड वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघांची भेट एका कला केंद्रात झाली होती, जिथे पूजा नर्तिका म्हणून काम करत होती. यानंतर त्यांची मैत्री प्रेमात बदलली. गोविंद यांनी पूजाला मोबाइल आणि दागिने भेट दिल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, पूजाच्या सततच्या मागण्या आणि वादामुळे गोविंद तणावात होते, असा दावा त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. नातेवाईकांचा आरोप आहे की, पूजाने गोविंद यांना ब्लॅकमेल करून पैशांची मागणी केली आणि त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केले.
पोलीस कोठडी आणि तपास
या प्रकरणी बार्शी न्यायालयाने पूजा गायकवाड हिला तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू असून, पूजाच्या सोशल मीडिया खात्यांवर पोस्ट केलेल्या रील्सचा तपासही केला जात आहे. आत्महत्येच्या दिवशी पूजाने तिच्या इन्स्टाग्रामवर तीन रील्स पोस्ट केल्या होत्या, त्यापैकी एक रील ‘झांझरिया’ या गाण्यावर नाचतानाचा आहे. या रील्स आणि तिच्या व्हिडिओमुळे प्रकरणाला वेगळे वळण मिळत आहे.
हे ही वाचा>> Pune: 'तू माझ्या वडिलांसोबत शारीरिक संबंध ठेव, कारण मी तर...' हनिमूनला गेलेल्या पतीने पत्नीला सांगितलं 'ते' सत्य
नातेवाईकांचा संशय आणि मागणी
गोविंद बर्गे यांचे नातेवाईक लक्ष्मण चव्हाण यांनी या प्रकरणात घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. “आमच्या दाजींकडे रिव्हॉल्वर नव्हतेच, मग ती त्यादिवशी कशी आली? त्यांना बऱ्याच दिवसांपासून त्रास दिला जात होता. पैशांची मागणी आणि ब्लॅकमेलिंगमुळे ते तणावात होते,” असे त्यांनी सांगितले. नातेवाईकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
सोशल मीडियावर संताप
पूजाचा व्हायरल व्हिडिओ आणि या प्रकरणामुळे सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी पूजाच्या वर्तनावर टीका केली असून, या घटनेत प्रेमापेक्षा पैशांचा खेळ मोठा असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यावरच हा खटला आत्महत्या आहे की घातपात, हे स्पष्ट होईल. सध्या पोलिसांकडून सर्व पैलूंवर तपास सुरू आहे.
ADVERTISEMENT
