उपसरपंचाला कसा लागला बाईचा नाद? महागडे गिफ्ट पाहून पूजा व्हायची खुश..खतरनाक लव्ह स्टोरीचा 'असा' झाला THE END

बीडमधील माजी उपसरपंच गोविंद बरगे यांच्या आत्महत्या प्रकरणात नर्तिका पूजा गायकवाड हिचे गोविंद बरगे यांच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचं समोर आलं. पण, पूजा गायकवाड आणि गोविंद बरगे यांचं प्रेमप्रकरण नेमकं कसं सुरू झालं?

उपसरपंचाला कसा लागला बाईचा नाद? खतरनाक लव्ह स्टोरीचा 'असा' झाला THE END

उपसरपंचाला कसा लागला बाईचा नाद? खतरनाक लव्ह स्टोरीचा 'असा' झाला THE END

मुंबई तक

• 01:17 PM • 12 Sep 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

उपसरपंच गोविंद बरगे यांना कसा लागला नर्तिकेचा नाद?

point

खतरनाक लव्ह स्टोरीचा 'असा' झाला THE END

बीड: बीडमधील माजी उपसरपंच गोविंद बरगे यांनी एका नर्तिकेच्या प्रेमात स्वत:ला गोळी झाडून घेतल्याच्या प्रकरणामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये, नर्तिका पूजा गायकवाड हिचे गोविंद बरगे यांच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचं समोर आलं. पण, पूजा गायकवाड आणि गोविंद बरगे यांचं प्रेमप्रकरण नेमकं कसं सुरू झालं? याविषयी सविस्तर जाणून घ्या. 

हे वाचलं का?

कुठे झाली ओळख? 

खरंतर, एका कला केंद्रात बरगे यांची पूजा गायकवाडशी भेट झाली. दोघांमध्ये जवळीक वाढली आणि त्यांच्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं. उपसरपंच बरगे बऱ्याचदा पूजाला महागड्या भेटवस्तू, दागिने आणि स्मार्टफोन द्यायचे. परंतु, त्यानंतर पूजा नेहमी गोविंद यांच्याकडे महागड्या गिफ्टची मागणी करू लागली, आणि त्यावेळी तिचा खरा चेहरा समोर आला. एके दिवशी तर, पूजाने मर्यादाच ओलांडली. तिने आपल्या भावासाठी पाच एकर जमीन आणि बरगे यांचा गेवराई बंगला आपल्या नावावर करण्यासाठी दबाव आणला. गोविंद यांनी पूजाच्या मागणीला नकार दिल्यानंतर पूजाने त्यांना बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत संपर्क तोडला. त्यामुळे गोविंद यांना प्रचंड मानसिक त्रास झाला. मानसिक ताणामुळे गोविंद यांनी 9 सप्टेंबर रोजी वैरागजवळ सासुरे गावात पूजाच्या घरासमोरच चारचाकी गाडीत डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. 

पूजाचा व्हिडीओ व्हायरल...

पूजा गायकवाड नेहमी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर रील्स शेअर करायची. गोविंद यांच्या निधनानंतर, तिची एक रील सध्या चर्चेचा विषय बनत आहे. बरगे यांच्या मृत्यूपूर्वी बरेच दिवस पूजाचं त्यांच्याशी बोलणं झालं नव्हतं. जवळपास एक आठवड्यापूर्वी पोस्ट केलेल्या एका रीलमध्ये पूजाच्या हाताच्या चारही बोटांमध्ये सोन्याच्या अंगठ्या दिसत आहेत आणि तिच्या हातात पाचशे रुपयांची नोट असल्याचं देखील दिसत आहे. या व्हिडीओमध्ये पूजा एका गाण्यावर लिप-सिंक करताना दिसत आहे. 'मुझे इस आदमी की एक अजीब आदत लग गई है, अगर यह मेरी जिंदगी से चला गया तो मेरे लिए बहुत मुश्किल हो जाएगी.' असे त्या गाण्याचे बोल आहेत.

 

या घटनेनंतर पूजा गायकवाडच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पूजाच्या धमक्या आणि आर्थिक दबावामुळे उपसरपंचांनी हे पाऊल उचलल्याचा तक्रारीत आरोप करण्यात आला आहे. 

पूजा गायकवाड पोलिसांच्या ताब्यात..

पूजा गायकवाड आता तीन दिवसांसाठी पोलिस कोठडीत आहे आणि तिच्या चौकशीतून काय समोर येणार? याची सर्वांना उत्सुकता आहे. याशिवाय, गोविंद बरगे यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टचीही पोलीस वाट पाहत आहेत.

    follow whatsapp