Govt Job: 'या' सरकारी बँकेत निघाली मोठ्या पदांसाठी भरती! कधीपर्यंत कराल अर्ज?

सरकारी बँकेत नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडून 'स्पेशलिस्ट ऑफिसर'च्या रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

भरतीसाठी काय आहे पात्रता?

भरतीसाठी काय आहे पात्रता?

मुंबई तक

• 02:51 PM • 12 Sep 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडून नवीन भरती...

point

कधीपर्यंत कराल अर्ज?

Govt Job: सरकारी बँकेत नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडून 'स्पेशलिस्ट ऑफिसर'च्या रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 11 सप्टेंबर रोजी सुरू झाली असून 2 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख निश्चित करण्यात आली आहे. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार sbi.bank.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. 

हे वाचलं का?

'या' पदांसाठी निघाली भरती

या भरतीच्या माध्यमातून स्पेशलिस्ट ऑफिसर पदाच्या एकूण 122 रिक्त जागांवर भरती केली जाणार आहे. 

मॅनेजर (Credit Analyst)- 63 पद
क्रेडिट अॅनालिस्ट (Products – Digital Platforms)- 34 पद
डेप्यूटी मॅनेजर (Products – Digital Platforms)- 25 पद

काय आहे पात्रता? 

या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडे पदानुसार, ग्रॅज्युएशन/एमबीए (Finance) / PGDBA / PGDBM / MMS (Finance)/ CA/ CFA/ ICWA/ बीई/ बीटेक/ कंप्यूटर सायन्स अशा संबंधित क्षेत्रात मास्टर्स डिग्री असणं आवश्यक आहे. 

वयोमर्यादा

पदानुसार, उमेदवारांसाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. 

मॅनेजर- 28 ते 35 वर्षे
क्रेडिट अॅनालिस्ट- 25 ते 35 वर्षे
डेप्यूटी मॅनेजर- 25 ते 32 वर्षे 

पात्रता आणि वयोमर्यादेच्या संदर्भात विस्तृत माहिती मिळवण्यासाठी उमेदवार SBI च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात. 

हे ही वाचा: मुंबईची खबर: आता मुंबईला जाण्यासाठी अर्ध्या तासाचा वेळ वाचणार! 'या' टोल नाक्याचा प्रश्न मार्गी लागणार...

अर्ज करण्याची प्रक्रिया

1. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम sbi.bank.in या SBI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. 
2. यानंतर, करिअर सेक्शनमधील 'Current Openings' मध्ये जा. 
3. आता ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्यावर क्लिक करा.
4. नव्या पेजवरील 'न्यू रजिस्ट्रेशन'वर क्लिक करून मागितलेले सर्व डिटेल्स भरा. 
5. त्यानंतर लॉगिन करून इतर माहिती भरून घ्या. 
6. शेवटी, अर्जाचं शुल्क भरून फॉर्म सबमिट करा आणि त्याची प्रिंटआउट काढून ती सुरक्षितरित्या ठेवा. 

हे ही वाचा: Govt Job: लाखोंच्या पगाराची नोकरी हवीये? मग एअरपोर्टवरील 'या' भरतीची संधी अजिबात सोडू नका...

अर्जाचं शुल्क 

या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी जनरल (Open), ओबीसी (OBC) आणि ईडब्ल्यूएस (EWS) प्रवर्गातील उमेदवारांसाठी 750 अर्जाचं शुल्क भरावं लागेल. एससी (SC), एसटी (ST), पीएच (PH) प्रवर्गातील उमेदवारांना भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी कोणत्याच प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही. उमेदवार ऑनलाइन माध्यमातून अर्ज करू शकतात. 

    follow whatsapp