Beed: बायकोकडून नवऱ्याला बेदम मारहाण, प्रायव्हेट पार्टवर मारल्या लाथा.. पतीचा जागीच गेला जीव!

Beed Crime: पत्नीने केलेल्या बेदम मारहाणीत पतीचा मृत्यू झाल्याच खळबळजनक घटना ही अंबाजोगाईमध्ये घडली आहे. या प्रकरणी आता पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

beed ambajogai wife brutally beats husband kicks him in private parts husband loses his life

पत्नीने केलेल्या मारहाणीत पतीचा मृत्यू

मुंबई तक

• 03:07 PM • 12 Sep 2025

follow google news

रोहिदास हातागळे, बीड: कौटुंबिक वादातून पत्नीने पतीला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत प्रायव्हेट पार्टवर मार लागल्याने पतीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अंबाजोगाई शहरातील क्रांतीनगर भागात बुधवारी (10 सप्टेंबर) हा प्रकार घडला. याप्रकरणी पत्नीवर अंबाजोगाई शहर ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

हे वाचलं का?

नेमकी घटना काय?

कैलास सरवदे (वय 37) असे मृत पतीचे नाव आहे. कैलासची बहिण ज्योती तरकसे हिने दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादीच्या तक्रारीनुसार, कैलास सरवदे याचे लग्न सात वर्षांपूर्वी माया हिच्याशी झाले होते. माया हिचे हे दुसरे लग्न असून पहिल्या पतीपासून तिला दोन मुली तर कैलासपासून एक मुलगा आणि एक मुलगी आहे. कैलास हा शरीराने दिव्यांग होता. याशिवाय त्याला दारू पिण्याचे व्यसनही होते. त्याच्या याच व्यसनामुळे त्याचे पत्नी मायाशी नेहमी वाद होत असत. तर माया ही कैलास याला नेहमी उपाशी ठेवत असे असा आता तिच्यावर आरोप करण्यात येत आहे.

हे ही वाचा>> अंगावरचे कपडे फाडून पत्नीला अर्धनग्न केलं, नंतर भर रस्त्यात... 'त्या' शिक्षिकेसोबत पतीने नेमकं काय केलं?

10 सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास कैलास हा दारू पिऊन घरी आल्यावर दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. माया हिने संतापाच्या भरात कैलासला खाली पाडून पोटावर व प्रायव्हेट पार्टवर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. घरच्यांनी व शेजाऱ्यांनी हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला असता मायाने त्यांना थेट सांगितलं की, 'तुम्ही हस्तक्षेप करू नका, दररोज हा दारु पिऊन असाच करतो, मी याला फुकट सांभाळायचं का?' असे म्हणत त्यांनाही शिवीगाळ केली. त्यानंतर काही वेळाने कैलास घराशेजारी बेशुद्ध पडलेला दिसला.

त्यानंतर नातेवाईकांनी त्याला ऑटोरिक्षाने सरकारी दवाखान्यात नेले. पण त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. सुरुवातीला मृत्यू दारूच्या अतिसेवनामुळे झाला असा समज होता. मात्र, दुसऱ्या दिवशी 11 सप्टेंबर रोजी झालेल्या शवविच्छेदन अहवालात कैलासचा मृत्यू मारहाणीत प्रायव्हेट पार्टवर झालेल्या गंभीर दुखापतींमुळे झाल्याचे स्पष्ट झाले.

हे ही वाचा>> 17 वर्षाच्या मुलाला घरी बोलावून 33 वर्षाची महिला करत होती शारीरिक संबंध, मुलीने नको त्या अवस्थेत पाहिलं अन्...

शवविच्छेदन अहवालानंतर या प्रकरणी जी फिर्याद दाखल करण्यात आली त्यामध्ये आरोपी पत्नी माया सरवदे हिने जाणूनबुजून पतीवर घातक मारहाण करून त्याचा मृत्यू घडवून आणल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात माया सरवदे हिच्यावर भादंवि कलम 105 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास PSI रविकुमार पवार हे करत आहेत.

    follow whatsapp