युपीएससीच्या विद्यार्थ्याने 'त्या' एका कारणाने गुप्तांगच छाटलं, वयाच्या 14 व्या वर्षांपासूनच जाणवू लागला बदल नंतर...

Crime News : युपीएससीची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थ्यासोबत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तरुणाने आपल्याच प्रायव्हेट पार्टला सर्जिकल ब्लेडनं छाटलं आहे.

crime news

crime news

मुंबई तक

• 05:16 PM • 12 Sep 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

युपीएससीच्या विद्यार्थ्यासोबत धक्कादायक घटना

point

प्रायव्हेट पार्टला सर्जिकल ब्लेडनं छाटलं

Crime News : युपीएससीची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थ्यासोबत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तरुणाने आपल्याच प्रायव्हेट पार्टला सर्जिकल ब्लेडनं छाटलं आहे. तरुण हा गंभीर घायाळ झाल्याचं दिसून येत आहे. त्यानंतर संबंधित तरुणाला एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, तरुणाने असं पाऊल का उचललं असेल याचं कारण आता समोर आलं आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : भाचीने मामीचे 'ते' गुपित उघड पाडले, पुतण्याचं प्रेम टिकवण्यासाठी नेमकं काय केलं?

वयाच्या 14 वर्षांपासूनच जाणवू लागला बदल

तरुणाचं म्हणणं आहे की, तो मुलगा नाही. आपण मुलगीच असल्याचं त्याला अनेकदा वाटू लागलं. वयाच्या 14 वर्षांपासूनच त्याला हा बदल जाणवू लागला होता. कुटुंबाच्या आणि समाजाच्या दबावाखाली त्याने आपलं म्हणणं मनातच दाबून ठेवलं. त्या तरुणाने लिंग बदलण्यासाठी युट्यूबवरून माहिती मिळवली असता, कटरा येथील एका बनावट डॉक्टरच्या सल्ल्यानुसार त्याने भूलीचं इंजेक्शन दिले आणि सर्जिकल ब्लेड विकत घेतले. त्यानंतर त्याने स्वत:चं गुप्तांग छाटलं.

भूल देण्याच्या औषधाचा परिणाम कमी झाल्यानंतर, पीडित तरुणाला वेदना होऊ लागल्या होत्या. शरमेने तो कोणाशीही काहीही बोलू शकला नाही. सुमारे एका तासानंतर जेव्हा वेदना वाढल्या तेव्हा त्याने घरमालकाला फोनद्वारे संपर्क केला असता, घरमालकाने रुग्णवाहिका बोलावली.

तरुणाला तेज बहादूर सप्रू बेली रुग्णालयात नेले, जिथं त्याची गंभीर प्रकृती पाहून त्याला एसआरएन रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले होते. संबंधित तरुणाने सांगितलं की, मला मुलींमध्ये इंटरेस्ट नाही, पण त्यांच्यासारखं वाटतं. पीडित तरुणाच्या आईने आपल्या मुलाला पाहून अस्वस्थ आणि दु:खी झाली होती. आपला मुलगा लवकर बरा व्हावा अशी डॉक्टरांकडे प्रार्थनाही केली होती.

हे ही वाचा : 'सरकारने मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू केल्याने...' तरुणाची सुसाईड नोट अन् खदखद व्यक्त करत नदीत घेतली उडी

बदल हवा असेल तर हार्मोन उपचार

वरिष्ठ सर्जनच्या मते, तरुणाला डिसफोरिया या आजाराने ग्रस्त केलं होतं. जर तरुणाला वेळेवर उपचार मिळाले नसते तर त्याला आपला जीव गमावावा लागला असता. डॉक्टरांनी त्या तरुणाचे मानसोपचारतज्ज्ञांकडून समुपदेशन सुरू केले आहे. जर त्याला लिंग बदल हवा असेल तर एक वर्षाच्या हार्मोन उपचार आणि देखरेखीनंतर लिंग बदल शस्त्रक्रिया करता येईल, असे सांगितलं.

    follow whatsapp