Latur Suicide : राज्यात मराठा आरक्षणाने रान पेटलं होतं, मराठा बांधव आणि आंदोलकांसह मनोज जरांगे पाटील हे 27 ऑगस्ट रोजी मुंबईत धडकले होते. तेव्हा मराठा समाजाने आरक्षणासाठी लढा उभारला होता. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केलं होतं. याच उपोषणाच्यादरम्यान सरकारने मराठवाड्यातील मराठ्यांना हैदराबाद गॅजेटनुसार ओबीसीत आरक्षण दिलं. आता ओबीसीचं आरक्षण गेल्याने एका लातूरातील तरुणाने मांजरी नदी पात्रत उडी घेत जीवन संपवलं. तरुणाने जीवन संपवताना चिंता व्यक्त करत एक सुसाईड नोटही लिहिली होती.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : पूजा गायकवाड नर्तिका तुरुंगात, तरीही फॉलोअर्समध्ये झाली तब्बल 'एवढी' वाढ, लाईक्सचा पडतोय पाऊस
तरुणाचे नाव भरत कराड (वय 35) असे तरुणाचे नाव आहे. या तरुणाने 10 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता मांजरा नदीत उडी मारून आत्महत्या केली. तरुण हा व्यक्ती ऑटो चालवून कुटुंबाचं उदरनिर्वाह करायचा. गेल्या काही वर्षांपासून ओबीसींच्या आंदोलनात त्याचा सहभाग असायचा. त्याने सुसाईड नोटमध्ये चिठ्ठीक आपले म्हणणं मांडलं.
नेमकं सुसाईड नोटमध्ये काय लिहिलं ?
तरुण बरत कराडने आत्महत्येनंतर सुसाईड नोट लिहिली होती, त्यात त्यानं लिहिलं होतं की, 'मी भरत महादेव कराड आताच्या महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू केल्याने ओबीसींच्या आंदोलनात वेळोवेळी सहभाग घेतला होता. तरीही ओबीसीविरोधात जीआर काढल्यामुळे मी माझे जीवन कायमस्वरुपी गमावत आहे. माझ्या पाठीमागे कुटुंबाला आणि ओबीसी समाजाला न्याय मिळावा', अशी सुसाईड नोट लिहिली होती.
हे ही वाचा : Pune: 'तू माझ्या वडिलांसोबत शारीरिक संबंध ठेव, कारण मी तर...' हनिमूनला गेलेल्या पतीने पत्नीला सांगितलं 'ते' सत्य
संबंधित प्रकरणात ओबीसी समर्थकाने आत्महत्या केल्यानंतर आता मंत्री छगन भुजबळ हे मृत तरुणाच्या भेटीसाठी लातूरला गेले आहेत. आत्महत्या केलेल्या तरुणाच्या वांगदरी गावी त्यांच्या घरी जाऊन ते कराड कुटुंबियांचं सांत्वन करणार आहेत.
ADVERTISEMENT
