Govt Job: सरकारी नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी चांगली बातमी समोर आली आहे. इंडियन ओव्हरसीज बँक (IOB) कडून स्पेशलिस्ट ऑफिसर (SO)च्या रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 127 पदांवर भरती केली जाणार आहे. यासाठी अर्जाची प्रक्रिया 12 सप्टेंबर 2025 पासून सुरू झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवार 3 ऑक्टोबर 2025 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. या भरतीसाठी उमेदवार iob.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात.
ADVERTISEMENT
काय आहे पात्रता?
या भरतीच्या माध्यमातून विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत. प्रत्येक पदासाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांकडे ग्रॅज्युएशन किंवा बी.आर्क, बी.टेक/बीई, एम.एससी, एमई/एम.टेक, एमबीए/पीजीडीएम, एमसीए आणि पीजीडीबीए सारख्या या क्षेत्रात डिग्री असणं गरजेचं आहे. उमेदवारांना अर्ज करण्यापूर्वी बँकेने जारी केलेलं भरतीचं नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला देण्यात येतो, जेणेकरून त्यांना पात्रता आणि अटींबद्दल संपूर्ण माहिती मिळू शकेल.
अर्जाचं शुल्क किती?
या भरती प्रक्रियेत, प्रवर्गानुसार अर्ज शुल्क देखील निश्चित करण्यात आले आहे. जनरल (Open), ओबीसी (OBC) आणि ईडब्ल्यूएस (EWS) प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 1,000 रुपये (जीएसटीसह) ठेवण्यात आलं आहे. तसेच, एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी केवळ 175 रुपये रुपये अर्जाचं शुल्क भरावं लागेल. उमेदवारांकडून केवळ ऑनलाइन माध्यमातूनच अर्जाचं शुल्क स्विकारलं जाईल.
हे ही वाचा: मुंबईची खबर: आता टॉप फ्लोअरवर राहणाऱ्या लोकांना Maintenance चार्ज लागणार नाही... मुंबई हायकोर्टाचा निर्णय!
किती मिळेल पगार?
एमएमजीएस-II (Middle Management Grade Scale II): या पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला 64,820 रुपये वेतन दिलं जाईल. त्यानंतर, अनुभव आणि प्रमोशनसह हा पगार 93,960 पर्यंत पोहोचू शकतो.
एमएमजीएस-III (Middle Management Grade Scale III): या ग्रेडमध्ये कर्मचाऱ्यांना 85,920 इतकं सुरुवातीला वेतन मिळेल आणि कमाल वेतन 1,05,280 रुपये दिलं जाईल. याव्यतिरिक्त, कर्मचाऱ्यांना बँकेच्या नियमांनुसार भत्ते आणि इतर सुविधा देखील दिल्या जातील.
निवड प्रक्रिया
या पदांवर उमेदवारांची नियुक्ती करण्यासाठी उमेदवारांची ऑनलाइन परीक्षा घेण्यात येईल. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावलं जाईल.
हे ही वाचा: Pune Crime: तरुणीने दुसरा तरूण आवडला, पहिला बॉयफ्रेंड चिडला थेट तलवार घेऊन... थरारक घटना CCTV मध्ये कैद
कसा कराल अर्ज?
1. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम iob.in या IOB च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
2. त्यानंतर, भरतीच्या सेक्शनमध्ये जाऊन 'Specialist Officer Recruitment 2025' या लिंकवर क्लिक करा.
3. दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचा आणि ऑनलाइन अर्ज भरा.
4. ऑनलाइन माध्यमातून अर्जाचं शुल्क भरा.
5. अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट कॉपी सुरक्षितरित्या ठेवा.
ADVERTISEMENT
