मुंबईची खबर: मुंबईकरांसाठी गूड न्यूज! तब्बल 25,000 हून अधिक इमारतींच्या OC चा प्रश्नच मिटला, आता नवीन धोरण...

सरकारच्या नवीन निर्णयानुसार, मुंबईतील 25 हजारांहून अधिक इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र म्हणजेच ऑक्यूपेन्सी सर्टिफिकेट (ओसी) देण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

25,000 हून अधिक इमारतींच्या OC चा प्रश्नच मिटला, आता नवीन धोरण...

25,000 हून अधिक इमारतींच्या OC चा प्रश्नच मिटला, आता नवीन धोरण...

मुंबई तक

• 05:44 PM • 13 Sep 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

25,000 हून अधिक इमारतींच्या OC चा प्रश्नच मिटला

point

आता नवीन धोरण... मुंंबईकरांना मिळणार दिलासा

Mumbai News: सरकारच्या नगरविकास मंत्रालय, बीएमसी, महसूल आणि सहकार विभागाच्या संयुक्त बैठकीत मुंबईकरांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार, मुंबईतील 25 हजारांहून अधिक इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र म्हणजेच ऑक्यूपेन्सी सर्टिफिकेट (ओसी) देण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या विकास नियंत्रण नियमावली, म्हाडा, एसआरए आणि इतर प्राधिकरणांअंतर्गत बांधलेल्या परंतु विविध कारणांमुळे ओसी (OC)नाकारलेल्या इमारतींना कायदेशीर मान्यता देण्यासाठी सरकार लवकरच एक नवीन धोरण तयार करणार असल्याचं मुंबई उपनगर पालकमंत्री आशिष शेलार यांनी सांगितलं.

हे वाचलं का?

2 ऑक्टोबरपासून नवीन धोरण...

गुरुवारी (11 सप्टेंबर) मंत्रालयात या विषयावर आधारित एक बैठक झाली. या बैठकीत माजी खासदार गोपाळ शेट्टी, स्थानिक आमदार मनीषा चौधरी, उत्तर मुंबईतील भाजपचे पदाधिकारी आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते. कॅबिनेट मंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक झाली. तसेच, नगरविकास विभाग 2 ऑक्टोबरपासून नवीन धोरण लागू करणार असल्याचं बैठकीनंतर शेलार यांनी सांगितलं. या धोरणांतर्गत, बांधकामादरम्यान झालेल्या तांत्रिक किंवा प्रशासकीय चुका दुरुस्त करून सोप्या प्रक्रियेद्वारे इमारतींना ओसी म्हणजेच भोगवटा प्रमाणपत्र दिलं जाईल.

हे ही वाचा: Pune: 2023 मध्ये बनली 'मिस इंटरनॅशनल इंडिया' अन् आता... पुण्याची ही तरूणी आहे तरी कोण?

ऑक्यूपेन्सी सर्टिफिकेट (OC) काय प्रमाणित करतं? 

बऱ्याच ठिकाणी, बांधकाम व्यावसायिकांनी आरक्षित फ्लॅट्स किंवा क्षेत्रे प्रशासनाला उपलब्ध करून दिली नव्हती, ज्यामुळे सामान्य नागरिकांना ओसी मिळू शकलं नाही. शासनाच्या नवीन धोरणामुळे, या समस्येचा सामना करणाऱ्या घरमालकांना ओसी मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. खरंतर, ऑक्यूपेन्सी सर्टिफिकेट (OC) असं प्रमाणित करते की इमारत मंजूर आराखड्यानुसार बांधली गेली आहे आणि अग्निसुरक्षा, संरचनात्मक स्थिरता तसेच ड्रेनेज यासारख्या सर्व आवश्यक सुरक्षा मानकांचे पालन करते, ज्यामुळे ती राहण्यास योग्य बनते.

हे ही वाचा: Govt Job: सरकारी बँकेत नोकरीसाठी प्रयत्न करताय? 'या' पदांसाठी लवकरच करा अर्ज...

ऑक्यूपेन्सी सर्टिफिकेट (OC) देण्याची प्रक्रिया 

महत्त्वाची बाब म्हणजे संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने आणि ऑनलाइन पद्धतीने राबवली जाईल, जेणेकरून नागरिकांना कोणत्याही अडचणीशिवाय याचा थेट लाभ मिळू शकेल. आता सोसायट्यांना ओसी मिळविण्यासाठी स्वतः पुढाकार घ्यावा लागेल. नवीन धोरणांतर्गत जर सोसायट्यांनी सामूहिक किंवा वैयक्तिक पातळीवर प्रस्ताव दिलं तर त्यांना पार्ट-ओसी देखील मिळू शकते.

    follow whatsapp