मुंबईची खबर: ओला, उबर नव्हे तर आता एसटी महामंडळाचे 'छावा राइड' ॲप! राज्य सरकारचा 'हा' निर्णय अन्...

राज्य सरकारच्या परिवहन विभागाने एसटी महामंडळाचे नवीन अ‍ॅप लॉन्च करण्याची घोषणा केली असून या अ‍ॅपचे नाव छावा' असेल. याविषयी सविस्तर माहिती जाणून घ्या.

ओला, उबर नव्हे तर आता एसटी महामंडळाचे 'छावा राइड' ॲप!

ओला, उबर नव्हे तर आता एसटी महामंडळाचे 'छावा राइड' ॲप!

मुंबई तक

• 05:41 PM • 07 Aug 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

एसटी महामंडळाचे 'छावा राइड' ॲप

point

एसटी महामंडळाचे नवीन अ‍ॅप लॉन्च करण्याची घोषणा...

Mumbai News: राज्य सरकार मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात ओला आणि उबर या अ‍ॅप-आधारित सेवांना टक्कर देणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. राज्य सरकारच्या परिवहन विभागाने एसटी महामंडळाचे नवीन अ‍ॅप लॉन्च करण्याची घोषणा केली असून या अ‍ॅपचे नाव 'छावा' असेल. याविषयी सविस्तर माहिती जाणून घ्या. 

हे वाचलं का?

'छावा राईड'ची सेवा

महाराष्ट्र सरकार आता ओला, उबर राईड प्रमाणे 'छावा राईड'ची सेवा सुरु करणार असल्याची बातमी समोर आली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक राज्य सरकार लवकरच त्यांची अधिकृत अॅप-आधारित वाहन सेवा सुरू करणार आहे, जी प्रवाशांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि किफायतशीर प्रवास पर्याय प्रदान करणार असल्याचे संकेत दिले आहेत. 

हे ही वाचा: राहुल गांधींनी दाखवली 'ती' मतदार यादी, पुरावे अन्... Voter list मध्ये नेमकी काय गडबड? समजून घ्या क्रोनोलॉजी

परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिली माहिती 

महाराष्ट्र सरकार एसटी महामंडळामार्फत 'छावा राईड' हे अ‍ॅप लॉन्च करणार आहे आणि हे अ‍ॅप प्रवाशांना चांगली सेवा देण्यासोबत हजारो बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या नवीन संधीही उपलब्ध करून देणार असल्याची माहिती आहे. परिवहन मंत्री सरनाईक यांच्या मते, अनेक खाजगी कंपन्या सध्या अनधिकृत अॅप्सद्वारे प्रवासी आणि चालकांकडून जास्त भाडं आकारून नफा कमवत आहेत. त्यांनी सांगितलं की, नवीन अॅपच्या नावासाठी 'जय महाराष्ट्र', 'महा राईड', 'महायात्री', 'महा गो' या पर्यायांवर चर्चा झाली होती, परंतु अखेर 'छावा राईड अॅप' या नावावर एकमत करण्यात आलं.

हे ही वाचा: "भाजप आणि निवडणूक आयोगाने मिळून मतं चोरली, महाराष्ट्रात तर..", महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत राहुल गांधींचा मोठा गौप्यस्फोट

प्रवाशांबरोबर एसटी महामंडळालाही फायदा 

आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्र्यांच्या अंतिम मंजुरीनंतर लवकरच हे अ‍ॅप लॉन्च केलं जाईल. आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडलेलं, तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देणारं आणि सामान्य प्रवाशांना स्वस्त आणि सुरक्षित सेवा देणारे अ‍ॅप आणण्याचं राज्य सरकारचे उद्दिष्ट आहे. एसटी महामंडळाकडे यंत्रणा, तंत्रज्ञान, मनुष्यबळ व जागा मुबलक प्रमाणात असल्यामुळे शासनाने असे ॲप विकसित करून चालवण्यासाठी एसटी महामंडळाला दिल्यास त्याचा फायदा प्रवाशांबरोबर एसटी महामंडळालाही होईल.

    follow whatsapp