Mumbai Crime: मुंबईतील मीरा रोडवर असलेला 'केम छो' ऑर्केस्ट्रा बार आता चर्चेचा विषय ठरत असल्याचं समोर आलं आहे. या बारमध्ये पोलिसांच्या छापेमारीत सीक्रेट रूम आणि अवैध कारनामे सुरु असल्याचा खुलासा करण्यात आला आहे. तपासणीसाठी या बारमध्ये पोलीस पोहचण्याच्या आधी अलार्म वाजायचा आणि त्यासोबत रेड लाइट दिसताच बारमधील वातावरण अगदी संस्कारी होत असल्याचं समोर आलं आहे.
ADVERTISEMENT
बारमध्ये सीक्रेट खोली
मेकअप रूमच्या मागे मुली रेकॉर्डेड म्यूझिकवर लिप-सिंक करत असायच्या. इतकेच नव्हे तर बारमध्ये एक गुप्त मार्ग होता, या मार्गातून गेल्यानंतर कोणीही एक सीक्रेट खोलीत पोहोचू शकत होता. पोलिसांनी छापा टाकल्यानंतर दरवाजा उघडताच तिथे 11 बार गर्ल्स लपलेल्या आढळल्या.
हे ही वाचा: "माझं वय मला माहित नाही..." दुसऱ्यांदा आई होणाऱ्या महिलेला विचारला 'तो' प्रश्न अन् पती थेट तुरुंगात...
पोलीस कर्मचाऱ्यांना बसला धक्का
पोलिसांच्या माहितीनुसार, त्या बारमध्ये 20 ते 25 बार गर्ल्स उपस्थित होत्या. खरंतर, नियमांनुसार, कोणत्याही ऑर्केस्ट्रा बारमध्ये 8 गायक (पुरुष/महिला) उपस्थित राहू शकतात. मात्र, 'केम छो' ऑर्केस्ट्रा बारमध्ये लाइव्ह सिंगिंग नसून मुली रेकॉर्डेड गाण्यावर ओठांच्या माध्यमातून केवळ प्रदर्शन करायच्या आणि बारमध्ये येणाऱ्या लोकांना लाइव्ह सिंगिंग असल्याचं भासवत होत्या. तसेच, बारमध्ये अलार्म वाजवून पोलिस येण्याची सूचना दिली जात असल्याचं देखील तपासात समोर आलं. येथील बार गर्ल्सना एका खोलीत लपवून ठेवण्यात आले होते. पोलिसांनी छापा टाकल्यानंतर बाहेरून सामान्य बारसारखं भासवण्यात येणाऱ्या या बारमध्ये गुप्त खोल्या पाहून अधिकारी स्वतःच थक्क झाले.
हे ही वाचा: Maharashtra Politics: प्रियंका चतुर्वेदींची PM मोदींशी भेट नक्कीच सहज नाही, नवा डाव रचलाय पण खेळी कोण आणि कधी...
स्थानिकांचा प्रश्न
पोलिसांनी या बारमध्ये छापा टाकल्यानंतर एक वर्षापूर्वी, हे केम-छो ऑर्केस्ट्रा डान्स बार 29 जून 2024 रोजी तत्कालीन महानगरपालिका आयुक्त संजय काटकर आणि पोलिस आयुक्त मधुकर पांडे यांनी स्वतः देखरेख करत पाडण्यास भाग पाडलं होतं. तसेच, 12 सप्टेंबर 2024 रोजी काशीमीरा पोलिस ठाण्यात या बियर बारचे मालक दिनकर हेगडे यांच्याविरुद्ध एमआरटीपी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता, परंतु हा तुटलेला बियर बार एका वर्षाच्या आत बेकायदेशीरपणे पुन्हा बांधण्यात आला. या ऑर्केस्ट्रा बारला कोणाचं संरक्षण मिळत आहे? असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला आहे.
ADVERTISEMENT
