मुंबईची खबर: ग्रीन लाइन मेट्रोचं काम लवकरच सुरू होणार! परिवहन मंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती..

ठाण्यातील मीरा-भाईंदरमध्ये ग्रीन लाइन मेट्रो प्रोजेक्टच्या कामाला वेग मिळणार असल्याची बातमी समोर आली आहे.

परिवहन मंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती..

परिवहन मंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती..

मुंबई तक

• 04:03 PM • 04 Dec 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

ग्रीन लाइन मेट्रोचं काम लवकरच सुरू होणार!

point

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती...

Mumbai News: ठाण्यातील मीरा-भाईंदरमध्ये आणखी एका मेट्रो प्रोजेक्टच्या कामाला वेग मिळणार असल्याची बातमी समोर आली आहे. गायमुख ते शिवाजी चौकापर्यंत बांधण्यात येणाऱ्या मेट्रो-10 म्हणजेच ग्रीन लाईन मेट्रोसाठी टेंडर तयार करण्याचे काम 15 डिसेंबरपासून सुरू होणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन डेव्हलपमेंट ऑथरिटी (MMRDA)च्या रिव्ह्यू मीटिंगमध्ये ही माहिती देण्यात आली. ही मीटिंग मेट्रो हेडक्वार्टरमध्ये झाल्याची माहिती आहे. 

हे वाचलं का?

जवळपास 4.66 लाख प्रवासी करतील प्रवास... 

खरं तर, मेट्रो-10 प्रोजेक्ट पूर्णपणे एलिव्हेटेड आणि 9.718 किमी लांब आहे. 8 हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पात गायमुख, रेती बंदर, चेना गाव, वर्सोवा गाव, काशीमीरा आणि मिरगाव 5 मेट्रो स्थानकांचा समावेश आहे. 2031 पर्यंत, ग्रीन लाईन प्रोजेक्टमधून जवळपास 4.66 लाख प्रवासी प्रवास करतील, असा अंदाज आहे. या मार्गिकेसाठी मोगरा पाडा येथे एक डेपो बांधण्याचा प्रस्ताव करण्यात आला आहे. हा मार्ग गायमुख येथील मेट्रो लाईन 4A ला जोडेल आणि मेट्रो लाईन 9 द्वारे मीरागावला कनेक्ट होईल.

हे ही वाचा: बिझनेस पार्टनर बनला जिगरी दोस्त, पण त्यानेच बायकोसोबत अनैतिक संबंध ठेऊन केला घात, संतापलेल्या रामेश्वरने ट्रॅक्टरने चिरडलं

जनरल कन्सल्टंट

यामुळे ठाणे आणि मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. या प्रोजेक्टसाठी सिस्ट्रा-DB जॉइंट व्हेंचरला जनरल कन्सल्टंट बनवण्यात आलं असून फॉरेस्ट CRZ, मॅन्ग्रोव्ह, वन्यजीव संरक्षण आणि इको-सेन्सिटिव्ह एरियासह मंजूरी घेण्याचं काम सुरू आहे. जनरल कन्सल्टंटने मेट्रो बांधकाम आणि लगतच्या 60 मीटर रुंदीच्या रस्त्यासाठी टेंडर डॉक्यूमेंट्स आधीच तयार केली असल्याची माहिती समोर आली आहे. 

हे ही वाचा: Govt Job: भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयात सहभागी व्हा! 'या' संस्थेत निघाली भरती... कधीपासून कराल अर्ज?

काही महिन्यांतच बांधकामाला सुरूवात 

मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेट्रो-10 मुळे मीरा-भाईंदर परिसरातील लोकांना अधिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. तसेच, हा प्रकल्प 2031 पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती आहे. याव्यतिरिक्त, मीरा-भाईंदर, ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी लवकरच पॉड टॅक्सी सेवा सुरू केली जाईल आणि पुढील सहा महिन्यांमध्ये या प्रोजेक्टचं बांधकाम सुरू करण्यात येईल. 

    follow whatsapp