बिझनेस पार्टनर बनला जिगरी दोस्त, पण त्यानेच बायकोसोबत अनैतिक संबंध ठेऊन केला घात, संतापलेल्या रामेश्वरने ट्रॅक्टरने चिरडलं
अनैतिक प्रेमसंबंधामुळे एका तरुणाने आपल्याच मित्राची ट्रॅक्टरने चिरडून हत्या केल्याची बातमी समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बिझनेस पार्टनरचे बायकोसोबत अनैतिक संबंध
संतापलेल्या तरुणाने ट्रॅक्टरने चिरडून केली मित्राची हत्या
Crime News: अनैतिक प्रेमसंबंधातून एक भयानक घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. संबंधित घटना ही राजस्थानच्या भीलवाडा शहरात घडली. येथील इंदिरा विहार कॉलनीमध्ये शनिवारी एका व्यक्तीचा रक्ताने माखलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. या प्रकरणासंदर्भात, पोलिसांनी सोमवारी (1 डिसेंबर) संध्याकाळच्या सुमारास मृताच्या मित्राला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीच्या पत्नीसोबत त्याच्या मित्राचे अनैतिक संबंध सुरू होते. याच कारणावरून, संतापलेल्या आरोपीने ट्रॅक्टर खाली मित्राची निर्घृण हत्या केली. सध्या, पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याची चौकशी केली जात आहे.
रस्त्याच्या कडेला रक्ताने माखलेला मृतदेह
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी भीलवाडा शहरातील इंदिरा विहार कॉलनीत रस्त्याच्या कडेला रक्ताने माखलेला मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि फॉरेन्सिक टीमसह घटनास्थळाची तपासणी करून पुरावे गोळा करण्यात आले.
हे ही वाचा: Govt Job: भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयात सहभागी व्हा! 'या' संस्थेत निघाली भरती... कधीपासून कराल अर्ज?
प्रकरणातील मृताची ओळख मृताची ओळख 45 वर्षीय महेंद्र अशी झाली असून तो भीलवाडा शहरातील तिळक नगर येथील रहिवासी असलेल्या छितर सिंग यांचा मुलगा होता. पोलिसांना मृतदेहाजवळ एक स्कूटी उभी असलेली दिसली. मृताच्या डोक्यावर जखमेच्या खुणा होत्या. घटनेनंतर पोलिसांनी मृतदेहाचं पोस्टमॉर्टम केलं आणि नंतर महेंद्रचा मृतदेह कुटुंबियांकडे सोपवण्यात आला.
हे ही वाचा: तरुणीच्या होणाऱ्या नवऱ्याला मॉर्फ केलेले अश्लील फोटो पाठवले अन्... एकतर्फी प्रेमातून आरोपीचं भयंकर कृत्य!
मित्रासोबत पत्नीचे अनैतिक संबंध
कुटुंबियांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. तसेच, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके तयार करण्यात आली. या प्रकरणासंबंधी पोलिसांनी बनेडा पोलिस स्टेशन परिसरातील लक्ष्मीपुरा येथील रहिवासी असलेल्या रामचंद्र जाट यांचा मुलगा रामेश्वर याची चौकशी केली आणि त्याने महेंद्रला ट्रॅक्टरने चिरडून हत्या केल्याची कबुली दिली. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी रामेश्वर आणि मृत महेंद्र हे एकमेकांचे चांगले मित्र होते आणि सात वर्षांपासून दुधाच्या व्यवसायात पार्टनर होते. दरम्यान, मृत महेंद्रचे रामेश्वरच्या पत्नीशी अनैतिक संबंध निर्माण झाले आणि यामुळे रामेश्वरने त्याचा मित्र महेंद्रची ट्रॅक्टरने चिरडून निर्घृण हत्या केली.










