धक्कादायक! रस्त्याच्या कडेला बास्केटमध्ये दोन दिवसांचं नवजात अर्भक, चिठ्ठीत लिहिलं मला माफ करा...नेमकं काय घडलं?

मुंबई तक

• 01:10 PM • 29 Jun 2025

Navi Mumbai News : नवी मुंबईतील पनवेल परिसरात एक काळीज हेलावून टाकणारी घटना घडली आहे. एका दोन दिवसांच्या नवजात अर्भकाला रस्त्याच्या कडेला ठेवलं होतं. ही घटना पनवेल येथील तक्का भागातील स्वप्नालय आश्रम येथील आहे.

navi mumbai news

navi mumbai news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

नवी मुंबईतील पनवेल परिसरात एक काळीज हेलावून टाकणारी घटना

point

दोन दिवसांच्या नवजात अर्भकाला रस्त्याच्या कडेला ठेवलं

Navi Mumbai News : नवी मुंबईतील पनवेल परिसरात एक काळीज हेलावून टाकणारी घटना घडली आहे. एका दोन दिवसांच्या नवजात अर्भकाला रस्त्याच्या कडेला ठेवलं होतं. ही घटना पनवेल येथील तक्का भागातील स्वप्नालय आश्रम येथील आहे. या घटचनेनं पनवेलमध्ये खळबळ उडाली आहे. हे अर्भक एका बास्केटमध्ये ठेवण्यात आले होते. त्या बास्केटमध्ये दुध पावडर, दुधाची बाटली आणि एक चिट्ठीही ठेवण्यात आली होती. दरम्यान, या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी याबाबत अधिक तपास केला. 

हे वाचलं का?

हेही वाचा : शिंदे गटाच्या नगरसेवकाने महिलेवर विनयभंग केल्याचा आरोप, थेट भररस्त्यात तुडवलं

पोलिसांनी अर्भकाच्या आई वडिलांना घेतलं ताब्यात

या प्रकरणात आता पोलिसांनी अर्भकाच्या आई बाबांना ताब्यात घेतलं आहे. कुटुंबियांना मुलगी पसंत नसल्याने लहान अर्भकाची आई ही तिच्या माहेरी भिवंडी येथे राहत होती. ती गर्भवती असल्याचे तिच्या घरच्यांना कळाले. 

दरम्यान, पोलिसांच्या चौकशीत आई वडील हे लहान बाळाला सांभाळणार असल्याची माहिती समोर आली. सध्या बाळ हे वात्सल्य ट्रस्टमध्ये असून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच बाळ परत आई वडिलांना देण्यात येईल, अशी माहिती समोर येत आहे. 

हेही वाचा : 30 वर्षांनंतर शनीचा महायोग! 'या' राशींच्या लोकांचे फळफळेल नशीब, नोकरी आणि व्यवसायात मिळेल नफाच नफा

चिट्ठीत नेमकं काय? 

या प्रकरणात स्थानिक नागरिकांनी माहिती दिली की, हे अर्भक रात्रीच्या वेळी कोणीतरी सोडून गेलं असावं. अर्भकासोबत सेरेलॅक, कपडे आणि इंग्रजीत लिहिलेली चिट्ठी होती. या चिट्ठीत मी बाळाचा सांभाळ करू शकत नाही. माझी अर्थिक स्थिती वाईट आहे. मानसिकदृष्ट्या सक्षम नसल्याने माझी हेळसांड होवू नये, त्याची काळजी घ्यावी, भविष्यात जर मला बाळाला भेटता आलं तर मी नक्की भेटेल. मला माफ करा, असे त्या चिट्ठीत लिहिलं होतं.