ठाणे: विवाहबाह्य संबंधाचं आणखी एक भयानक प्रकरण! पतीची निर्घृण हत्या अन् उल्हास नदीत मृतदेह फेकला...

एका महिलेने आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीची निर्घृण हत्या केल्याचं वृत्त आहे. हत्येनंतर, मृत पतीचा मृतदेह उल्हास नदीत फेकण्यात आलं. या घटनेने शरीरात एकच खळबळ उडाली आहे.

पतीची निर्घृण हत्या अन् उल्हास नदीत मृतदेह फेकला...

पतीची निर्घृण हत्या अन् उल्हास नदीत मृतदेह फेकला...

मुंबई तक

• 05:18 PM • 09 Nov 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

विवाहबाह्य संबंधाचं आणखी एक भयानक प्रकरण!

point

पतीची निर्घृण हत्या अन् उल्हास नदीत मृतदेह फेकला...

Thane Crime: ठाणे जिल्ह्यात विवाहबाह्य संबंधातून एक धक्कादायक घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. येथे एका महिलेने आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीची निर्घृण हत्या केल्याचं वृत्त आहे. हत्येनंतर, मृत पतीचा मृतदेह उल्हास नदीत फेकण्यात आलं. या घटनेने शरीरात एकच खळबळ उडाली आहे. आता पोलिसांनी आरोपी पत्नी आणि त्याच्या प्रियकराची अटक केली आहे. 

हे वाचलं का?

पत्नीचे विवाहित तरुणासोबत प्रेमसंबंध...

पोलिसांच्या माहितीनुसार, बदलापूर पश्चिम येथे एक किसन परमार नावाचा 44 वर्षीय तरुण आपली पत्नी मनीषा परमार आणि त्यांच्या तीन मुलांसोबत राहत होता. संबंधित व्यक्तीला कामाच्या निमित्ताने बऱ्याचदा शहराबाहेर जावं लागत होतं. दरम्यान, किसनची पत्नी मनीषाचे त्याच बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या एका लक्ष्मण भोईर (36) नावाच्या विवाहित तरुणासोबत प्रेमसंबंध सुरू झाले. एके दिवशी, किसनला आपल्या पत्नीच्या अनैतिक संबंधाबद्दल माहिती मिळाली. त्यावेळी, त्याने मनीषाला तिच्या विवाहबाह्य संबंधाबाबत जाब विचारला. मात्र, त्यानंतर दोघांमध्ये सतत वाद सुरू झाले. 

हे ही वाचा: भूतबाधेच्या नावाखाली तरुणीसोबत भयानक प्रकार! उदबत्तीचे चटके अन् राख खायला दिली, अखेर बेशुद्ध झाली अन्...

निर्घृण हत्या अन् मृतदेह नदीत फेकून दिला..

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (7 नोव्हेंबर) मध्यरात्री पती झोपेत असतानाच मनीषा आणि तिच्या प्रियकराने मिळून भयानक कृत्य केलं. त्या दोघांनी मिळून किसनचा दोरीने गळा दाबून त्याची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर, आरोपींनी पीडित तरुणाचा मृतदेह एका गोधडीत गुंडाळला आणि तो बाईकवरून नेऊन बदलापूरच्या वालिवली पुलाजवळील उल्हास नदीत फेकून दिला. त्यानंतर, आरोपी तिथून फरार झाले. 

हे ही वाचा: तानाजी सावंत म्हणाले, राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही, आता अजित पवारांचं जोरदार प्रत्युत्तर

पोलिसांची माहिती 

संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली. किसनचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आला. संबंधित प्रकरणाबाबत बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनमध्ये आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेतील आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता (बीएनएस) च्या कलम 103(1) (हत्या) आणि 238 (गुन्ह्यातील पुरावे नष्ट करणे) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आरोपी पत्नी आणि तिच्या विवाहित प्रियकराला अटक करण्यात आली असून संबंधित प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

    follow whatsapp