ठाणे: पत्नीसोबत सतत वाद, शेवटी मित्रांना सांगून विषारी साप आणला अन्... महिलेसोबत घडलं भयानक!

महिलेची हत्या कोणत्याही सामान्य पद्धतीने नव्हे तर तिला विषारी साप चावल्याने झाली होती.

मित्रांना सांगून विषारी साप आणला अन्...

मित्रांना सांगून विषारी साप आणला अन्...

मुंबई तक

• 11:44 AM • 13 Dec 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

पतीचे पत्नीसोबत सतत वाद...

point

शेवटी मित्रांना सांगून विषारी साप आणला अन्...

point

पीडित महिलेसोबत घडलं भयानक!

Thane Crime: ठाण्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. एका महिलेच्या हत्येप्रकरणी चार आरोपींना अटक केल्याचं सांगितलं जात आहे. जवळपास तीन वर्षांपूर्वी संबंधित महिलेची हत्या करण्यात आली असून अखेर, पोलिसांनी या घटनेतील आरोपींना अटक केल्याची माहिती आहे. आरोपींमध्ये पीडितेच्या पतीसह चार लोकांचा समावेश आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, महिलेची हत्या कोणत्याही सामान्य पद्धतीने नव्हे तर तिला विषारी साप चावल्याने झाली होती.

हे वाचलं का?

पोलिसांचा संशय बळावला अन्... 

मिळालेल्या माहितीनुसार, 10 जुलै 2022 रोजी नीरजा रूपेश आंबेकर नावाच्या एका महिलेचा बदलापूर पूर्व येथे उज्वलदीप सोसायटीमधील घरात मृत्यू झाला. त्यावेळी, महिलेचा आकस्मित मृत्यू (Accidental Death) समजून गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुरूवातीच्या तपासात, या प्रकरणासंबंधी कोणावर संशय निर्माण झाला नाही. मात्र, कालांतराने काही साक्षीदारांच्या जबाबातील विरोधाभास समोर आले आणि पोलिसांनी पुन्हा या प्रकरणाचा सखोल तपास करण्यास सुरूवात केली. 

पत्नीसोबतच्या वादातून हत्येचं प्लॅनिंग 

प्रकरणाच्या तपासादरम्यान, मृत महिलेचे तिच्या 40 वर्षीय पती रूपेश आंबेकरसोबत सतत कौटुंबिक वाद होत असल्याचं समोर आलं. पत्नीसोबत सतत वाद होत असल्याकारणाने त्याने पीडितेचा कायमचा काटा काढण्याचं ठरवलं. या कटात, आरोपीसोबत रिशिकेश रमेश चालके आणि कुणाल विश्वनाथ चौधरी या त्याच्या मित्रांचा समावेश होता. 

हे ही वाचा: पतीचे त्याच्या वहिनीसोबत अनैतिक संबंध अन् दिराने केला बलात्कार! सासरी महिला कॉन्स्टेबलसोबत भयानक प्रकार...

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी चेतन विजय दुधाणे (36) नावाच्या सर्प बचाव स्वयंसेवकाशी संपर्क साधला, आरोपीच्या सांगण्यावरून नीरजाच्या हत्येसाठी चेतन त्यांच्यासाठी एक विषारी साप घेऊन आला. ठरल्याप्रमाणे, नीरजाला त्याच सापाने चावले आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. आरोपींना वाटलं की सर्पदंशामुळे झालेला मृत्यू नैसर्गिक किंवा अपघाती मानला जाईल आणि या हत्येच्या प्रकरणातून त्यांची सुटका होईल. 

हे ही वाचा: एक्स्प्रेसवर कारमधील कपलचा अश्लील व्हिडीओ व्हायरल... तुमच्यावर अशी परिस्थिती ओढवल्यास आधी 'हे' करा

पोलिसांनी दिली माहिती 

पोलिसांचा तपास आणि टेक्निकल पुराव्यांच्या आधारे, या हत्येच्या प्रकरणातील सत्य घटना उघडकीस आली. आता, तीन वर्षांनंतर पोलिसांनी महिलेचा खून केल्याप्रकरणी पतीसह चार आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी नितीन पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित प्रकरणाचा अधिक तपास केला जात असून आरोपींची देखील कठोर चौकशी केला जात आहे.  

    follow whatsapp